स्वानंद प्रोजेक्ट ही संकल्पना जिनवाणीचे संकलन आधुनिक पद्धतीने


         पंढरपूर,०७ /०१/२०२१ - स्वानंद प्रोजेक्ट ही संकल्पना जिनवाणीचे संकलन आधुनिक पद्धतीने स्वतःच्या कलागुणांना वाव देत शॉर्ट बट स्वीट या दृष्टीने व्हावे यासाठी झाली. १५ मार्च २०२० रोजी याची माहिती सर्वांना देण्यात आली आणि थोड्याच दिवसात लाँकडाऊन झाले. कोरोनाने हाहाकार माजला पण जिनवाणीच्या उपासकांनी याचा वापर अत्यंत चांगल्या रीतीने केला.

             ५० प्रोजेक्ट तयार करण्यात आले

      प्रोजेक्टमध्ये दिलेल्या विषयांचा सखोल अभ्यास करून पुणे,सोलापूर,सातारा जिल्हयातील पंढरपूर, वैराग,म्हसवड, नातेपुते,फलटण,पुणे आदी अनेक गावातून चांगला प्रतिसाद मिळाला. ५० प्रोजेक्ट तयार करण्यात आले. प्रत्येकाने अत्यंत सुंदररित्या कलाकुसर,ड्रॉइंग क्राँफ्ट या माध्यमातून आपल्या विषयाची मांडणी केली.


         प.पू.आचार्य शांतीसागरजी महाराज,प.पू.वीरसागरजी महाराज,प.पू.सुशीलमती माताजी, ४७ शक्ती,६४ ऋध्दी ,जैन धर्म व आधुनिक विज्ञान इत्यादी अनेक विषय घेऊन हस्तलिखित ग्रंथांचे संकलन झाले.


         परीक्षणासाठी कुंभोज बाहुबली येथे डॉ वीतराग दोशी, एस.एस.पाटील सर,बा.ब्र.विद्याताई ,डॉ. स्वयंप्रभा पाटील यांच्याकडे पाठवण्यात आले होते.याचा निकाल दि ३ जानेवारी २०२१ रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर सर्व परीक्षकांच्या हस्ते व वीरसागरनगर येथील आदिनाथ दिगंबर जैन मंदिराचे ट्रस्टी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.


स्वानंद प्रोजेक्ट रिझल्ट
पंढरपूर बाहेर
१ प्रथम क्रमांक- जैन ऐतिहासिक स्त्रिया- संगीता दोशी, पूजा देशमाने, म्हसवड
२. द्वितीय क्रमांक - (A) हूँ पूर्ण मैं - तेजल दोशी, किशोरी दोशी - फलटण
(B) संसार चक्र - स्वाती दोशी, सीमा दोशी, फलटण
३.तृतीय क्रमांक - ६४ ऋद्धी - शोभा दोशी,संगीता दोशी,समता दोशी -फलटण
४चतुर्थ क्रमांक -( A) एक ध्रुवध्यासी-तेजश्री अभिजीत दोशी व ग्रुप - नातेपुते
( B ) सल्लेखना -तेजश्री विशाल दोशी व ग्रुप - नातेपुते
५.पंचम क्रमांक - (A )चार अनुयोग-राजश्री व नीलम गांधी -नातेपुते
( B) उपसर्ग विजय मुनिराज - अनुजा दोशी, सौरभ दोशी, म्हसवड

पंढरपूर मधील

१. प्रथम क्रमांक - वीरसागरांची वीर गाथा - स्नेहाली फडे, सोनाली फडे
२. द्वितीया क्रमांक -
(A)चैतन्य सागर - प्रदीपकुमार फडे व परिवार
(B) चलते फिरते सिद्धों से गुरू - क्रांती फडे, विजया फडे
३. तृतीय क्रमांक -
(A) जैन धर्म व आधुनिक विज्ञान - योगिता गांधी
(B) ज्ञान पायोनिधी - जलप्रभा गांधी,भाग्यश्री, स्नेहा,सोहम गांधी 
(C) भावातिशय - प्रेरणा,दीपा दोशी,सुनिता दोशी, पूनम दोशी
४. चतुर्थ क्रमांक - 
(A) आत्मपरिणती - आशिष गांधी,परम,शुद्धी
(B) वीरांगना - शुभांगी गांधी, रंगोली फडे

विशेष पुरस्कार

१.बेस्ट ड्रॉइंग- एकेंद्रीय ते पंचेंद्रिय जीवाचे आत्मकथन- नीना दोशी, रूपाली दोशी-फलटण
२.बेस्ट क्राफ्ट-आचार्य शांतिसागर महाराज- सारंगा गांधी व ग्रुप,वैराग
३.बेस्ट सब्जेक्ट कव्हरेज-अरुण खडके,पंढरपूर
४.प्रॉपर सेटिंग -आशा गांधी,रुजल गांधी,पंढरपूर

      या कार्यक्रमाचे नियोजन आयोजन स्वयंसिद्धा महिला मंडळ,पंढरपूर यांनी केले अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा सौ प्रीती अशिष गांधी, उपाध्यक्ष सौ सपना अजित गांधी यांनी दिली.या कार्यक्रमासाठी स्वयंसिद्धा महिला मंडळ,पंढरपूर सदस्यांनी विशेष प्रयत्न केले. 

स्वानंद प्रोजेक्ट ही संकल्पना म्हणजे आधुनिक पद्धतीने जिनवाणीचे संकलन concept of swanand project is a modern collection of jinwani
 
Top