पंढरपूर ते कोलकता सायकल प्रवास करून वयाची एकष्ठी साजरी....

       पंढरपूर.(प्रतिनिधी)-पंढरपूर येथील दिगंबर भोसले यांनी पंढरपूर ते कोलकत्ता हा सायकल प्रवास करून वयाची साठी उलटून देखील आपण २२३७ कि.मी.चा प्रवास सायकलवरून पूर्ण करु शकतो. हे दिगंबर भोसले यांनी दाखवून तरुण पिढीला आश्चर्यचकीत करुन टाकले.

           या सायकल प्रवासात इंजिनिअरिंग क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या सचिन राऊत हा एकवीस वर्षांचा तरुण देखील सामील होता. एक साठीकडे झुकलेला तर एक तरुण ही जोडगोळी पंढरपूरच्या रुक्मिणी माता ते कलकत्त्याच्या काली माता हा सायकलवरील प्रवास त्यांनी पंचवीस दिवसांमध्ये पूर्ण केला आहे.

 पंढरपूर येथील पंढरी सायकल मॅरेथाॅनचे मुख्य आयोजक व आम्ही पंढरपुरकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर कदम यांनी व पत्रकार राधेश बादले पाटील यांनी बहुमोल सहकार्य केले आहे.

       दिगंबर भोसले हे एकसष्ट वर्ष पुर्ण करीत आहेत त्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या हस्ते सायकलपट्टू दिगंबर भोसले , सचीन राऊत यांचा सत्कार करण्यात आला. 

        यावेळी दिगंबर भोसलेंचे मोठे बंधू सोलापूर जिल्हा माजी शिवसेना प्रमुख दत्ता भोसले व अवधूत भोसले आणि कुटूंबीय सदस्य मित्रमंडळी उपस्थित होते.

पंढरपूर ते कोलकता सायकल प्रवास करून वयाची एकष्ठी साजरी 
celebrating age by cycling from pandharpur to kolkata
 
Top