निवडणूकीचे कामकाज जबाबदारीने पार पाडा - तहसिलदार तथा निवडणूक प्रधिकृत अधिकारी सांळुखे यांच्या सूचना
         पंढरपूर,दि.११/०१/२०२१- पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३४८ मतदान केंद्र होते त्यापैकी एकूण १७ वार्ड बिनविरोध झाल्याने ३३१ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे.ग्रामपंचायतीसाठी दि.१५ जानेवारीला सार्वत्रिक मतदान घेतले जाणार असून, ग्राम पंचायत निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व मतदान प्रक्रिया जबाबदारीने पार पाडाव्यात अशा सूचना तहसिलदार तथा निवडणूक प्रधिकृत अधिकारी विवेक सांळुखे यांनी दिल्या.

अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुसरे प्रशिक्षण दोन सत्रात 

       पंढरपूर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवीन शासकीय धान्य गोदाम,अनवली ता.पंढरपूर येथे नियुक्त १ हजार ७३६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची यांना दुसरे प्रशिक्षण दोन सत्रात देण्यात आले.यावेळी निवडणूक नायब तहसिलदार एस.पी.तिटकारे,महसूल सहाय्यक एस.आर. कोळी यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जेणेकरुन मतदान कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात आली

        निवडणूक नियुक्त अधिकारी,कर्मचारी यांना मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया कशी पार पाडावी,प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील समस्यांचे निराकरण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. टपाल मतदानासाठी मागणी केलेल्या कर्मचाऱ्यांना जवळपासच्या गावात नियुक्त केले जाणार असून, त्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करुन त्यांचे मतदान करून घेतले जाणार आहे.यासाठी संबधितांना एक तासाची मुभा देऊन त्याअनुषंगाने आवश्यकती मदत केली जाणार आहे. जेणेकरुन मतदान कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात आली असल्याचे तहसिलदार तथा निवडणूक प्रधिकृत अधिकारी सांळुखे यांनी सांगितले.

      प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण

        मतदान साहित्य स्विकृतीपासून मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदान घेताना घ्यावयाची खबरदारी, विविध संवेधानिक, असंवेधानिक लिफाफे,अर्ज भरणे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.यामध्ये कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट जोडणी, प्रत्यक्ष मतदान करतांना मतदान यंत्रात बिघाड झाल्यास तात्काळ करण्यात येणाऱ्या उपाययोजना आदींबाबत माहिती निवडणूक प्रधिकृत अधिकारी सांळुखे यांनी दिली. प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. याबाबत उपस्थित शंकाचे समाधानही यावेळी करण्यात आले.

निवडणूकीचे कामकाज जबाबदारीने पार पाडा - तहसिलदार तथा निवडणूक प्रधिकृत अधिकारी सांळुखे 
carry out election work responsibly - tehsildar election authority officer sanlukhe 
 
Top