पालघर,२७/०१/२०२१- पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे,अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम देशमुख ,पालघर उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांचे मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान अनुषंगाने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने केळवा सागरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ब्लड बँक यांचे समन्वयाने सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


केळवा सागरी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी भीमसेन गायकवाड यांनी पोलिस ठाणे परिसरा तील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करून नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले होते. त्यामुळे २६ जानेवारी केळवा परिसरातील तरुण वर्ग तसेच महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या निमित्ताने सातशे ते आठशे नागरिकांनी पोलिस ठाण्यात उपस्थिती दर्शवली होती.रक्तदाना मध्ये रक्तदा त्यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय केळवा पोलीस ठाणे येथील पुरुष व महिला पोलिस अधिकारी अंमलदार तसेच पोलिस पाटील सरपंच सामाजिक कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमास हजेरी लावून ३३० रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड व त्यांच्या टीमचे कौतुक पोलिसांचे वतीने करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. केळवा सागरी पोलीस ठाण्याच्यावतीने रक्तदात्यांना टी-शर्ट व पुष्पगुच्छ देऊन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमास केळवा सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भीमसेन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक हरीश धनगर व पोलीस अंमलदार यांनी केलेल्या जनजागृती नियोजनामुळे रक्तदान शिबिर कार्यक्रम यशस्वी पार पडला.

केळवा सागरी पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर 
blood donation camp at kelwa marine police station
 
Top