भाळवणी गट बनला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला


         ग्रामपंचायत निवडणूक निकालातून भाळवणी गट हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच बालेकिल्ला बनल्याचे दिसून आले आहे .गटातील १० गावामध्ये निवडणूक लागली होती.त्यापैकी जैनवाडी हे गाव बिनविरोध करुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष ॲड.दिपक पवार यांनी विजयी सलामी दिली होती.


         भाळवणी गटामध्ये १०८ सदस्य संख्या असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ४३,परिचारक गट ३७, काळे गट २३ तर सेना २,अपक्ष व स्थानिक गट ३ असे एकूण बलाबल आहे. जवळपास निम्म्या जागेवरती विजय मिळवत प्रस्थापित नेत्यांना हादरे देण्यात राष्ट्रवादीची नव्या दमाची तरुण मंडळी यशस्वी झाली आहेत.


       परिचारकांच्या भाजप प्रवेशाने गटातील व तालुक्यातील राष्ट्रवादी सपंल्याचे चित्र होते.त्यानंतर ॲड.दिपक दामोदर पवार यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड झालेनंतर गावोगावी युवकांची फळी उभी करण्यात ते यशस्वी झाले.


       त्यामुळेच मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काळे व परीचारक हे मातब्बर नेते एकत्र असताना देखील भाळवणी गटातून व तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांना भरघोस मतदान झाले.येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तरुणांची ही भक्कम फळी निर्णायक ठरेल हे नक्की.


भाळवणी गट ता.पंढरपूर बनला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला bhalwani group became stronghold of ncp


 
Top