एचआयव्ही जनजागृती व निर्मुलन कार्याची दखल


       कुर्डुवाडी,(प्रतिनिधी),१३/०१/२०२१ - राष्ट्रीय युवक दिन व हुतात्मा दिनानिमित्त डॉ.व्ही.एम.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर,जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्र सोलापूर,जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय ,श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर व साथी संस्था,सोलापूर यांच्यावतीने एड्स जनजागृती व निर्मूलनमध्ये आजपर्यंत केलेल्या कार्याबद्दल उत्कृष्ठ आयसीटीसी म्हणून ग्रामीण रुग्णालय कुर्डुवाडी आयसीटीसीला प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले,उपअधिष्ठाता डॉ.जयकर यांचे हस्ते समुपदेशक कमरगणी तांबोळी व प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुरेश गोरे माळी यांना प्रदान करण्यात आला आहे. 

    कुर्डुवाडीच्या कमरगणी तांबोळी व सुरेश गोरे यांना हा पुरस्कार एचआयव्ही जनजागृती आणि  निर्मुलन कार्याची दखल घेऊन देण्यात आला आहे.    

कुर्डुवाडीच्या कमरगणी तांबोळी व सुरेश गोरे यांना पुरस्कार 
award to kamargani tamboli and suresh gore of kurduwadi 
 
Top