मंगळवेढ्यात जप्त वाळू साठ्याचा लिलाव

          पंढरपूर,दि.१२/०१/२०२१- जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव मंगळवार दिनांक १९ जानेवारी २०२१ रोजी दुपारी १२.०० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.

     मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथे अवैध वाळू वाहतुक व साठ्यावर केलेल्या कारवाईत सन २०१८-१९ मध्ये संयुक्त वाळू ठेक्याच्या  लिलावा मधील शिल्लक असलेल्या सुमारे ४ हजार ६४४. ८४ ब्रास वाळू साठा जप्त केला असून,हा वाळू साठा मौजे सिध्दापूर ता.मंगळवेढा येथे ठेवण्यात आला आहे. या ठिकाणच्या वाळू साठ्याची किंमत सुमारे एक कोटी ७१ लाख ८५ हजार ९०८ रुपये  इतकी आहे. ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावावयाचा अशा व्यक्तींनी संबधीत ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी. तसेच लिलावात भाग घेण्यासाठी सोमवार  दिनांक १८ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत लेखी अर्ज उपविभागीय अधिकारी मंगळवेढा, उपविभाग विभाग मंगळवेढा यांच्याकडे सादर करावेत,असेही उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले.

 लिलावात भाग घेण्यासाठी २५ टक्के रक्कम 

   सदर लिलावात भाग घेण्यासाठी २५ टक्के रक्कम रोख अथवा डी.डी.व्दारे भरावी.त्याच बरोबर अर्जाचे शुल्क रुपये २ हजार विनापरतावा भरणे आवश्यक आहे. तसेच सर्वोत्तम बोलीची २५ टक्के रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाव्दारे जमा करावी.बोलीची उर्वरीत ७५ टक्के रक्कम शासकीय खजिन्यात ७ दिवसांच्या आत भरल्यानंतर स्वत:कडील वाहना व्दारे संबधीत ठिकाणावरुन वाळू घेवून जावी. लिलावात भाग घेण्या-या व्यक्तींनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत तसेच नमुद ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.

मंगळवेढ्यात जप्त वाळू साठ्याचा लिलाव auction of confiscated sand stocks on tuesday
 
Top