पंढरपूर,२६ जानेवारी २०२१,(नागेश आदापूरे)- ७२ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील अरिहंत इंग्लिश मेडियम स्कूल येथे पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते प्रणव परिचारक हे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना प्रणव परिचारक यांनी विद्यार्थी मित्रांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगत शुभेच्छा दिल्या.शाळेच्या उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी संस्थेचे डॉ.शितल शहा,उज्वल दोशी, मिलिंद शहा,प्रिन्सिपल बहिरट मॅडम आणि सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
अरिहंत इंग्लिश मेडियम स्कूल येथे प्रजासत्ताक दिन साजरा republic day celebrations at arihant english medium school