पंढरपूर - पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधना नागेेश भोसले ,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, सर्व सदस्य,पदाधिकारी तसेच सभापती व आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली नागरी हिवताप योजना नगर परिषद पंढरपूर या कार्यालयामार्फत पंढरपूरात किटकजन्य रोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी तसेच कोरोना प्रतिबंधासाठी दैनंदिन डास आळीनाशक फवारणी, जंतुनाशक फवारणी पाठीवरील पंपाद्वारे करण्यात येत आहे.कंटेनर सर्वेक्षण,धूर फवारणी, डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडणे कोरोना प्रतिबंधासाठी फवारणी व आरोग्य शिक्षण इत्यादी कारवाई केली जाते आहे.

             प्रतिबंधासाठी मायकिंगद्वारे जनजागृती

      माहे मार्च महिन्यापासून शहरात दैनंदिन स्तरावर कोरोना प्रतिबंधासाठी सार्वजनिक ठिकाणे,बँका, पोस्ट ऑफिस,रेल्वे स्टेशन,s.t.बस स्थानक तसेच विठ्ठल मंदिर व परिसरात भाविकांच्या गर्दीच्या ठिकाणी व इतर सार्वजनिक ठिकाणी जंतूनाशक फवारणी व किटकजन्य आजार व covid-19 च्या प्रतिबंधासाठी मायकिंगद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. पंढरपूर शहर तसेच उपनगरात डास निर्मूलनासाठी धूर फवारणी करण्यात आली. त्या अनुषंगाने माहे जानेवारीमध्ये आज अखेर एकूण ३९,५०००० स्क्वेअर मीटर क्षेत्रफळावर , डास आळीनाशक ४ लाख ७६ हजार ५०० स्क्वेअर मीटर भागावर जंतूनाशक फवारणी ३० हात पंपाद्वारे करण्यात आली.कंटेनर सर्वेक्षणा मध्ये एकूण १५६२३ घरांची तपासणी केली असता ९११ घरे दूषित आढळून आली तसेच २९५२९ कंटेनर पाण्याची भांडी तपासून ९१६ कंटेनरमध्ये डास आळ्यादूषित आढळून आले.सदर कंटेनर मध्ये अबेट/टेमीफाँस आळी नाशकाचा वापर करण्यात आला.

शहरात ११५ ठिकाणी गप्पी मासे पैदास केंद्र कार्यान्वित

    माहे जानेवारी २०२१ मध्ये एकूण ६३ डासोत्पत्ती ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले असून पंढरपूर शहरात एकूण ११५ ठिकाणी गप्पी मासे पैदास केंद्र कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. डास नियंत्रणासाठी पंढरपूर शहरातील एकूण ६ हजार ४२१ घरांमध्ये धूर फवारणी करण्यात आली.तसेच किटकजन्य आजार व covid-19 प्रतिबंधासाठी १०००० हस्त पत्रिका वाटण्यात आल्या.किटकजन्य आजारासाठी पोषक वातावरण असल्याने शहरात आलेल्या भाविकांना तसेच सर्व नागरिकांनी आव्हान करण्यात येते की, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा व आपल्या घर व मठ परिसरात सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.आपला परिसर स्वच्छ ठेवावा.तसेच घरांमधील फ्रीज कूलर,फुलदाण्या, कुंड्या इत्यादीमध्ये पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.घराभोवतालचे भंगार सामान,निरुपयोगी टायर,चहाचे कप, नारळाच्या करवंट्या इत्यादी सामानाची त्वरित विल्हेवाट लावावी असे आवाहन आरोग्य विभागा मार्फत करण्यात येत आहे.नागरिकांनी किटकजन्य आजार व साथरोग होऊ नये म्हणून शासनाचे मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ साधना भोसले, उपनगराध्यक्षा श्वेता डोंबे,आरोग्य समितीचे सभापती विक्रम शिरसाट, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,आरोग्याधिकारी डाँँ. गायकवाड,जीवशास्त्रज्ञ यांनी जनतेस केले आहे covid-19 च्या प्रतिबंधासाठी सॅनिटायझर,मास्क व सोशल डिस्टंसिंगचा वापर करावा हात साबणाने वारंवार धुवावे.कोरोना प्रतिबंधा साठी औषध फवारणी करणे तसेच गर्दीत जाण्याचे टाळावे असे आवाहन आरोग्य विभाग व नागरी हिवताप योजना पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर यांच्याकडून करण्यात येत आहे.

ज्या नागरिकांना गप्पी मासे हवे आहेत त्या नागरिकांनी नागरी हिवताप योजनेच्या कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन हिवताप अधिकारी किरण मंजुळ यांनी केले आहे.

साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन 
an appeal to take care of background of epidemic diseases 
 
Top