पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यापासून पगार न झाल्याने व शासनाकडून वेतन अनुदान न मिळाल्याने उद्यापासून सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करणार
   पंढरपूर, ०४/०१/२०२१- पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यापासून पगार न झाल्याने दि २९ डिसेंबर रोजी नगरपरिषदेसमोर कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे, राज्याचे सरचिटणीस सुनील वाळुजकर,कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारेंसह कार्याध्यक्ष शरद वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले होते.

महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदांना कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर व्हावे

   महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदांना कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर व्हावे या हेतूने शासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सहाय्यक वेतन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन होणे आवश्यक आहे परंतु शासनाकडून वेतनासाठी मिळणारी सहाय्यक अनुदानाची रक्कम वेळेवर न मिळाल्याने नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत कोरोनाच्या काळात हेच सर्व नगरपरिषद कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून गेल्या मार्च महिन्यापासून काम करीत आहेत परंतु शासनाकडून गेल्या दोन वर्षापासून सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम प्रत्येक महिन्याच्या वीस तारखे नंतर दिली जाते त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार हा २३/२४ तारखेला होतो परंतु शासनाकडून अद्याप पर्यंत सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम पंढरपूर नगरपरिषदेला दिली गेली नाही त्यामुळे पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून वेतनापासून वंचित राहिला आहे त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सहाय्यक वेतन अनुदान मिळावे म्हणून शासनाचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी  व  सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम मिळावी यासाठी पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी संघटनेचेवतीने नगरपरिषदेसमोर दि २९ डिसेंबर २०२० रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले होते व  येत्या ४ जानेवारी २०२१ पर्यंत सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम पंढरपूर नगरपरिषदेला  मिळाली नाही तर ५ जानेवारीपासून पंढरपूर नगरपालिका बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असा इशारा कामगार संघटनेच्यावतीने देण्यात आला होता याबाबत उद्या दि ५ जानेवारी २०२१ पासून करण्यात येणारे काम बंद आंदोलनचे निवेदन आज मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर , नगराध्यक्ष सौ साधनाताई नागेश भोसले यांना संघटनेचे अध्यक्ष महादेव अदापुरे सरचिटणीस सुनील वाळुजकर , कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे,सह कार्याध्यक्ष शरद वाघमारे , नागन्नाथ तोडकर,उपाध्यक्ष जयंत पवार,अनिल गोयल यांच्या शिष्टमंडळाने  दिले.

पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान न मिळाल्याने उद्यापासून सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन 
all employees of pandharpur municipal council have stopped work from tomorrow due to non-receipt of salary subsidy
 
Top