पहिल्या टप्प्यातील लसीकरण उपजिल्हा रुग्णालय येथे

  

 पंढरपूर,दि.१५/०१/२०२१ -पहिल्या टप्प्यातील लसीकरण दिनांक १६ जानेवारी २०२१ रोजी उपजिल्हा रुग्णालय येथील संसर्गजन्य रुग्णालय येथे करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने व आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली असून, कोविड लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

              यासाठी कोविन ॲपवर यादी संकलित 

           पहिल्या टप्प्यात १६१० डोज उपलब्ध झाले असून, तालुक्यातील डॉक्टर्स व आरोग्य सेवा देणाऱ्या संबंधित कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी कोविन ॲपवर यादी संकलित करण्यात आली आहे.संबधित लाभार्थ्याना नोंदणी केलेल्या मोबईलवर लसीकरणाबाबत संदेश प्राप्त होणार आहे. आरोग्य विभागाने लसीकरणाच्या ठिकाणी लसीकरण कक्ष, निरिक्षण कक्ष तसेच ॲब्युलन्स सेवा सुसज्ज ठेवण्याबाबत दक्षता घ्यावी तसेच आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवाव्यात अशा सूचनाही श्री.ढोले यांनी यावेळी दिल्या.
 

      उपजिल्हा रुग्णालय रुग्णालय पंढरपूर येथील संसर्गजन्य रुग्णालय पंढरपूर येथे १६ जानेवारीला लसीकरण करण्यात येणार असून,यासाठी लसीकरणाची सर्व तयारी आरोग्य विभागाने केली असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम यांनी दिली.

 लसीकरण कक्षाचे उदघाटन प्रातांधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते होणार 

       आरोग्य सेवेशी संबंधित १०० जणांना  लस देण्यात येणार आहे.यासाठी कोविन ॲपवर यादी संकलित करण्यात आली आहे.लस देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांला रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक दिवस अगोदर वेळ व ठिकाणची माहिती देणारा संदेश येणार आहे. यासाठी संबधितांनी नोंदणी करताना जे ओळखपत्र जोडले आहे ते घेवून यावे.लाभार्थी लसीकरण कक्षात आल्यानंतर त्यांची माहिती घेतल्यानंतरच त्यांना लसीकरण केले जाणार आहे.लसीकरण केल्यानंतर संबधितांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली अर्धा तास निरिक्षण कक्षात ठेवण्यात येणार आहे. यानंतर त्यांना घरी पाठविण्यात येणार असल्याचे डॉ.गिराम यांनी सांगितले.  

         कोविड लस ही २ ते ८ डिग्री सेल्सीअस तापमाणात लस ठेवावी लागत असल्याने सुसज्ज अशी रेफ्रीजेटरची व्यवस्था उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे करण्यात आली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.बोधले यांनी दिली. लाभार्थ्यांना लस सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० यावेळत देण्यात येणार आहे . लाभार्थी लसीकरण करुन घरी आल्यानंतरही त्यांना काही त्रास झाला तर यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने समिती स्थापन करण्यात आली असून, यामध्ये शासकीय व खाजगी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.संबधितावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तात्काळ उपचार केले जाणार आहेत याबाबत कोणतीही भीती अथवा गैरसमज बाळगू नये असे आवाहनही डॉ.बोधले यांनी केले आहे.  

कोविड लसीकरणासाठी प्रशासन सज्ज - प्रांताधिकारी सचिन ढोले 
administration ready for covid vaccination - prantadhikari sachin dhole
 
Top