आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे नाव शासकीय अभिवादन यादीत - महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या प्रयत्नाला यश
     फलटण,दि.२५/०१/२०२१- महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या पाठपुराव्यानंतर मराठी वृतपत्र सृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ती यांच्या शासकीय अभिवादन यादीत नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे,अशी माहिती महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

      याबाबत माहिती देताना बेडकिहाळ यांनी सांगितले की,राज्य शासनाचे मंत्रालय,विधि मंडळ,विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी,जिल्हा परिषद व अन्य शासकीय, निमशासकीय जिल्हा व तालुका कार्यालये यातून विविध क्षेत्रात ऐतिहासिक उल्लेखनीय कार्य करणारे राष्ट्रपुरुष / थोर व्यक्तींना त्यांच्या जयंती/पुण्यतिथी दिवशी राज्यशासनाच्यावतीने अभिवादन करण्यात येते. या शासकीय यादीमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे नाव शासनाने समाविष्ट करावे, अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे केली होती. ना.अजित पवार यांनी यावेळी उपस्थित सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांकडून या यादीची सविस्तर माहिती घेऊन तातडीने बाळशास्त्री जांभेकरांचे नाव या यादीत घ्यावे, असे निर्देश या बैठकीतच दिले होते. त्यानंतर राज्यशासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक जपूती2020/प्र.क्र.95/29 दिनांक 14 जानेवारी 2021 नुसार सदर नाव या यादीत समाविष्ट केल्याचे शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाचा राज्यशासन शासकीय अभिवादन यादीत तातडीने समावेश

         महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या आग्रही मागणी नुसार राज्यासह संपूर्ण देशातील मराठी वृत्तपत्रे, पत्रकार यांची अस्मिता व मानबिंदू असलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाचा राज्यशासनाच्या शासकीय अभिवादन यादीत तातडीने समावेश केल्याबद्दल संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खास अभिनंदन करण्यात आले आहे.

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे नाव शासकीय अभिवादन यादीत 
acharya balshastri jambhekars name in government greeting list
 
Top