सोलापुर गुन्हे अन्वेषण विभाग ग्रामीण पथकावर दगडफेक तीन पोलिस जखमी


    कुर्डुवाडी,(प्रतिनिधि)- येथील बारलोणी,ता माढा  barloni सांगोला गुन्हेतील संशयित गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या सोलापुर गुन्हे अन्वेषण विभाग ग्रामीण पथकावर दगडफेक करण्यात आली.यात तीन पोलिस अधिकारी जखमी झाले होते.सदर संशयित आरोपीने त्याच्या ३० ते ४० साथीदारसह पोलिसावर हल्ला केला होता. यात पोलीस गाडीचेही नुकसान झाले आहे .त्यानंतर जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते tejswini satpute कुर्डूवाडी येथे दाखल झाल्या होत्या.पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ.विशाल हिरे,कुर्डुवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रविंद्र डोंगरें सह शंभरपेक्षा अधिक पोलिस व १५ पोलीस गाड्या पथक घटनास्थळी दाखल झाले होते. 


       मिळालेल्या माहितीनुसार सोलापुर ग्रामीण पोलिस दलातील पोलिस निरिक्षक सर्जेराव पाटील ,सहा.पोलिस निरीक्षक रविंद्र मांजरे,ख्वाजा मुजावर,पोलिस हवालदार नारायण गोलेकर, धनाजी गायकवाड,समिर शेख सांगोला येथील घडलेल्या गुन्हयातील संशयिताला पकडण्यासाठी गेले होते.सदर घटनेनंतर बारलोणी गावात दहशत पसरली होती .

बारलोणी येथे पोलिसांवर दगडफेक करणारे आरोपी पकडले 


      यानंतर सोलापुर गुन्हे अन्वेषण विभाग ग्रामिण पथकावर झालेल्या दगडफेकीमधील आरोपी  राहुल सर्जेराव गुंजाळ,वय २२,यशवंत दशरथ गुंजाळ,वय ३०,अनिल दशरथ गुंजाळ, वय ४१    या फरार झालेल्या गुन्हेगारांना पकडण्यात कुर्डूवाडी पोलीसांना यश आले आहे. 

आरोपीना चार दिवसाची पोलिस कोठडी 

    त्या आरोपींना माढा न्यायालयाने चार दिवसांची दि.१३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

    सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांनी ही धाडशी मोहीम फत्ते केली आहे.कव्हे - बारलोणी रोडवर एका ठिकाणी लपून बसलेल्यांची माहिती पोलीस खब-यामार्फत कुर्डूवाडी पोलीसांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांनी हवालदार दत्ता सोमवर, हवालदार प्रविण दराडे,हवालदार सागर सुरवसे यांनी आरोपींना अटक केली आहे.

बारलोणी येथे पोलिसांवर दगडफेक करणारे आरोपी पकडले 
accused of throwing stones at police caught in barloni
 
Top