बृहन्मुंबईचा कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनचा मसुदा अंतिम करण्यासाठी संबंधित संस्थेस सूचित करावे - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्राद्वारे विनंती
        मुंबई,जानेवारी २०,२०२१- बृहन्मुंबईचा कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन (सीझेडएमपी) चा मसुदा अंतिम करण्याची प्रक्रिया गतिमान होण्याच्या दृष्टीने संबंधित नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट (एनसीएससीएम) या प्राधिकृत संस्थेस आवश्यक सूचना द्याव्यात,अशी विनंती राज्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण,वने आणि वातावरणीय बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे केली आहे.

२०१९ चा मसुदा लवकर अंतिम होणे अपेक्षित

      चेन्नई येथील एनसीएससीएम या संस्थेने मुंबई शहर,मुंबई उपनगर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदूर्ग, ठाणे आणि पालघर जिल्हा क्षेत्राचे कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनचा मसुदा तयार करण्याचे काम केले आहे.यावर सार्वजनिक सुनावण्याही जिल्हास्तरा वर घेण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयही महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यात कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन, २०१९ च्या मसुद्याचा आढावा घेत असून मुंबईचा कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन, २०१९ चा मसुदा लवकर अंतिम होणे अपेक्षित आहे.

या प्राधिकृत संस्थेस आवश्यक सूचना द्याव्यात

    नॅशनल कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी यांनी २८ ऑगस्ट २०२० रोजी यासंदर्भात आढावा घेतला असून यामध्ये महाराष्ट्रातील कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन, २०१९ च्या मसुदा तांत्रिक छाननी समितीसमोर तपासणीसाठी ठेवला जाईल, असे नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट (एनसीएससीएम) या संस्थेने सांगितले आहे. त्यानुसार तांत्रिक छाननी समितीची बैठक २० नोव्हेंबर २०२० रोजी चेन्नई येथे झाली असून या बैठकीमध्ये मुंबईच्या कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन, २०१९ च्या मसुद्यावर विस्तृत चर्चा झाली. या अनुषंगाने बृहन्मुंबईचा कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन (सीझेडएमपी) चा मसुदा अंतिम करण्याची प्रक्रिया गतिमान होण्याच्या दृष्टीने संबंधीत नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट (एनसीएस सीएम) या प्राधिकृत संस्थेस आवश्यक सूचना द्याव्यात, अशी विनंती पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे यांनी केली आहे.


बृहन्मुंबईचा कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन मसुदा अंतिम करण्याची प्रक्रिया गतिमान करा accelerate process of finalizing draft coastal zone management plan of greater mumbai
 
Top