करोना जनजागृतीचे २७५ भाग - करोना जनजागृतीची सांगता Part 275 of Corona Awareness - Conclusion of Corona Awareness  पंढरपूर,दि.२३ जानेवारी २०२१(नागेश आदापूरे) -Covid-19 या महामारीची सुरुवात झाल्यानंतर त्याची साखळी तोडण्यासाठी काही आवश्यक गोष्टींचे अनुपालन समाजातील लोकांकडून झाल्यास साखळी तोडणे सुलभ होत असल्याने, त्यास जनजागृती हा उत्तम पर्याय होत असल्याने अशी जनजागृती काव्य मनोरंजन व भित्तपत्रके हे समाज माध्यमाचा उपयोग करून जनजागृती केल्यास प्रभावी ठरणारे असून लघु काव्यात दिलेला संदेश लोकांचे मनात दीर्घकाळ राहत असतो हे सूत्र लक्षात घेऊन कोव्हिड योद्धा ऍड वर्षा गायकवाड व सुप्रसिद्ध साहित्य व कवयित्री लता बहिरट या दोघींनी मिळून एक जनजागृतीपर लघु काव्य प्रसिद्ध करून ते द्रुकश्राव्य स्वरूपात ऍड वर्षा गायकवाड यांनी सादर करून सामाजिक माध्यमाद्वारे प्रसिद्ध केले.    आज या उपक्रमाचे द्विशतक होता हे सातत्याने ओळीने सलग दोनशे पंच्याहत्तर दिवस ही लघु काव्य दृकश्राव्य माध्यमातून प्रसारित केली, दिनांक- 20 जानेवारी 2021 रोजी 275 वा भाग प्रदर्शित करून जनजागृती ची सांगता केली. त्यामुळे कोव्हिडं नियमाचे अनुपालन करण्यासाठी जनजागृतीचे कार्यात त्यांनी मोठे योगदान केले आहे याबद्दल सर्वत्र दोघींचे कौतुक होत आहे. याच बरोबर दोघीनी, पंढरपूर शहर व आसपासच्या तालुक्यातील covid-19 चे महामार्गाचे कालावधीत नोडल ऑफिसर म्हणून आपली जबाबदारी पार पाडणारे कर्तव्यदक्ष अधिकारी उपविभागीय अधिकारी श्री सचिन ढोले व शहर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी. के. धोत्रे यांचे ऋणनिर्देश लॉकडाउनच्या काळात रांगोळ्या काढून, रस्त्यावर घोषवाक्य लिहून, लहान मुलांच्या माध्यमातून यात्रा घरीच राहून साजरी करा सांगणारे दृक्श्राव्य संदेश जनजागृती व प्रबोधन करणाऱ्या एडवोकेट वर्षा गायकवाड व पंढरपुरातील साहित्यिक कवयत्री दौलता बहिरट यांनी त्यांची समक्ष भेट घेऊन व त्यांचे भरीव कार्याबद्दल ऋणनिर्देश व्यक्त करून सत्कार केला.


 यावेळी उत्स्फूर्तपणे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी त्याचा प्रतिसाद देऊन आम्ही तुमचा सत्कार केला पाहिजे असे गौरवोद्गार काढले व ओळीने 275 दिवस काव्यपंक्तीतून व दृकश्राव्य माध्यमातून वाचन करून जनजागृती केल्याबद्दल धन्यवाद केले, तर डॉक्टर साहेबांनी पंढरपूर वासीय या काळात प्रशासनाला मदत करीत असल्याने ह्या संकटाचा सामना करीत असल्याचे सांगितले अशी माहिती पंढरपूर चे सुप्रसिद्ध जेष्ठ विधिज्ञ ऍड बी. ए. बहिरट यांनी दिली.
 
Top