कुर्डुवाडी,(राहुल धोका),३१/०१/२०२१- महाराष्ट्र शासन अध्यादेशावर कारवाई आपेक्षित , सत्ता प्रकार १ चा जीआर पुनः लागु केला गेला.

कुर्डुवाडी शहरात ९१७ मालमत्ता या महाराष्ट्र शासन ब वर्ग असल्याची नोंद इस १९९४ साली तत्कालीन भुमिआभिलेख सर्वेक्षणात केली गेली. आशा मालमत्तांसाठी महाराष्ट्र शासनाने जी आर काढला असुन त्यानुसार या मालमत्ता वर्ग १ करणे गरजेचे आहे.

                       मुख्याधिकारी समीर भुमकर

       महाराष्ट्र शासनाने दि २८ जानेवारी रोजी शासकिय जमिन भोगवाटदार वर्ग २चे वर्ग १ मध्ये  मध्ये करण्यास पुनः अनुमती दिली असून याबाबत सर्व ९१७ मालमत्ता अद्यादेशा प्रमाणे वर्ग १ मध्ये रुपांतरीत करण्याची मागणी होत आहे. यासाठी सर्वसाधरण सभेत नगरपरिषदेकडून ठराव करुन तो जिल्हाधिकारी यांना पाठवणे अपेक्षित आहे. याबाबत कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांतूनही मागणी होत आहे.आतापर्यंत ९१७ प्रकरणी केवळ निवडणुक मुद्दा म्हणुन पाहिला गेला आहे.

   प्रत्येक निवडणुकीत याबाबत आदेश काढणे,त्या संबधी सभा बोलवणे असे प्रकार होत आहेत. त्या मुळे नागरिकांचा या प्रकियेवरील विश्वास उडाला  आहे. तरी सरळ व सोपी पध्दत अवलंबून ठोस निर्णय घेवून सदर प्रश्न सोडवणे गरजेचे आहे.

९१७ प्रकरणासाठी एक खिडकी पध्दत अवलंब करावा,प्रांत ,भुमी आभिलेख, मुख्याधिकारी यांनी संयुक्तपणे सरळ व सोप्या पध्दतीने सदर प्रकरणी या मालमत्ता धारकाना किती रक्कम सत्ता प्रकार अ साठी भरावी लागेल याची नोटिस द्यावी.१९९४ नंतरच्या खरेदीदारांना दंडासहित रक्कम नोटीस दयावी.किमान आता तरी लालफितीमध्ये  प्रकरणे ठेवून विलंब करु नये 
-डाॅ विलास मेहता,कार्याध्यक्ष , कुर्डुवाडी व्यासपिठ
    ९१७ मालमत्ता धारकांपैकी अनेकांनी बांधकामे केली आहेत.त्याना बांधकाम परवाना नसल्याने दर वर्षी शास्ती लावली जाते. याबाबतही नगरपरिषदे कडून सदर शास्तीविषयी अधिकृत प्रस्ताव मागवून केवळ एक वेळेस दंड आकारणी करणार असा जी आरप्रमाणे ठराव झाला. याबाबत अनेकांनी तसे प्रस्ताव ही दिले आहेत. पंरतु गत चार वर्षात यावर काहिही करवाई झालेली नाही. ९१७ प्रकरणातील नागरिकांची अपेक्षा प्रशासन वास्तविक स्वरुपात पुर्ण करेल अशी आशाही अनेक जण बाळगून आहेत .मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी सदर जी आर प्रमाणे मालमत्ताधारकांना सत्ता प्रकार १ मध्ये वर्ग केले गेले आहे मात्र पश्चिम महाराष्ट्र यापासून वंचित आहे. सध्याचे मुख्याधिकारी समीर भुमकर यांची भुमिका याबाबत सकारात्मक आहे त्यामुळे नागरिक मोठ्या अपेक्षा बाळगून आहेत.

कुर्डुवाडी ९१७ मालमत्ता प्रश्न सुटणार,नागरिकांची अपेक्षा 
Kurduwadi 917 Property issue will be resolved,citizens expect
 
Top