अतुलनीय व्यक्तिमत्त्वाची अमूल्य अनुभूती
Invaluable experience of incomparable personality

दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती

 "दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती" ह्या उक्तीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा दैवदुर्लभ लाभ मला मिळाला. माणसातले माणूसपण शोधत असताना माणसातला देव सापडला तो चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे मालक श्री अतुलकुमार Atulkumar Shah जीनदत्त शहा सराफ बारामती वय वर्ष 58 यांच्यामधे.साधी राहणी,उच्च विचारसरणी आणि ऊक्ती व कृती यात एकरूपता असणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व.बुद्धी चातुर्याबरोबरच दयाळू पणाचे क्षमाशिलतेचे पण शिस्तप्रिय सद्गुण त्यांचे पिताश्री जिनदत्त चंदुलाल शहा यांच्याकडून त्यांच्या अंगात उतरले. तसेच त्यांच्या मातोश्री श्रीमती कुसुमताई जीनदत्त शहा यांनी केलेल्या सुसंस्कारामुळे त्यांची आयुष्यात जडण-घडण योग्य पद्धतीने झाली. जैन धर्मातील जीवदया भूतदया इत्यादी तत्वांचे दैनंदिन जीवनामध्ये तंतोतंत पालन करून पारंपारिक सराफी व्यवसायाचे व्यावहारिक स्वरूप उत्तुंग शिखरावर पोहोचवण्याचे काम याच व्यक्तिमत्त्वाने केले. त्यांचे ज्येष्ठ बंधू मा. किशोरकुमार जीनदत्त शहा यांची त्यांना तोलामोलाची व अमुल्य साथ लाभली. जेष्ठ बंधू किशोरकुमार, त्यांचे मार्गदर्शन, विचारांचे आदान-प्रदान व प्रभावी समन्वय "एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ" या ऊक्तीप्रमाणे पारंपारिक व्यवसाय वृद्धीसाठी कुठल्याही प्रकारची तडजोड न करता ज्येष्ठ बंधू किशोर कुमार उर्फ किशोरकाका सराफ यांनी अतुल काकांना अतिशय मौलिक साथ दिली आहे. त्यांचेही सराफी व्यवसायवृद्धीमध्ये महत्त्वाचे योगदान आहे. याचा साक्षात अनुभव मिळाला. मी अतुल जिनदत्त शहा उर्फ अतुल काका (सराफ) यांच्यासमवेत मागील तीन वर्षापासून कार्यरत असताना वेळोवेळी त्यांनी स्विकारलेली जीवनमुल्ये व अंगिकारलेले विचार, त्यांच्या स्वभावातील विविध पैलु जवळून पाहण्यास व अनुभवास मिळाले. समाजातील आदर्श व्यक्तींची माहिती व त्यांचा परिचय करून देणे ही माझी सामाजिक जबाबदारी आहे असे मी समजतो. आपण दैनंदिन जीवन व्यतीत करत असताना सार्वजनिक जीवनामधील अनेक असे आदर्श आहेत कि त्याचा कोठेही उल्लेख होत नाही व अशी सर्व व्यक्तिमत्वे प्रसिद्धी पराङगमुख असतात.अशा थोर व्यक्तिमत्त्वांना प्रसिद्धीची अथवा कोणत्याही जाहिरातीची ईच्छा, आवड व तशी आवश्यकताही नसते. परंतु त्यांचे सामाजिक कार्य व सामाजिक सर्वांगीण विकासकामातील  योगदान समाजापुढे आदर्श म्हणून ठरतात. प्रत्येक व्यक्तिमत्वाचे व्यवहारिक संबंध, नात्याचे संबंध, मैत्रीचे संबंध, व्यावसायिक संबंध, असे अनेक प्रकारचे संबंध असतात. प्रत्येकाला आपापल्या जागी ठेऊन त्यांचे महत्व सांभाळणे व संबंध कायम ठेऊन वृद्धींगत करण्याचे  कौशल्य अतुल काकामध्ये जाणवते.  प्रत्येकाशी बोलताना, वागताना, राहताना त्या त्या गोष्टींचे व संबंधाची जाणीव ठेवून संपर्क ठेवणे ही अतिशय अवघड कला अतुल काकांनी अंगिकारलेली दिसून येते.


     सामाजिक कार्याची त्यांना विशेष आवड.दीन, दुबळे, निराधार,वृद्ध,दुर्बल घटक त्यांना सुखा समाधानाने जीवन जगता यावे यासाठी आत्यंतिक तळमळीने व विचारपूर्वक नियोजनबद्ध काम करताना अनुभवले आहे.अतूलकाकांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून आजतागायत राबवलेले आहेत. अतुल काकांचे सामाजिक कार्यातील योगदान उल्लेखनीय असते व गरजवंतांची गरज भागवणे हेच त्यांच्या सामाजिक योगदानाचे गमक आहे. उदाहरणार्थ श्री दिगंबर जैन सिद्ध क्षेत्र कुंथलगिरी तालुका भूम या ठिकाणी पावसाच्या कमी प्रमाणा मुळे उन्हाळ्यामध्ये भक्तनिवास व विद्यार्थी वस्तीगृह तसेच निसर्ग व वृक्ष संगोपन करिता पाण्याचा तुटवडा भासत असे. पाण्याचे सुयोग्य नियोजन करून भविष्यात पाण्याचा तुटवडा पडू नये यासाठी 68 लाख 75 हजार 280 लिटर क्षमतेचा पाणी साठवण तलाव बांधूनच श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र, कुंथलगीरी येथील पाण्याची कायमची व्यवस्था करून दिली.


     त्याचप्रमाणे ज्या संस्था उल्लेखनीय सामाजिक कार्य करतात अशा संस्थांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना प्रेरणा मिळेल व संस्थेचे कार्यकारिणी सदस्य उत्साहाने, जोमाने काम करतील यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यामध्ये अतुल काकांचा नेहमीच पुढाकार असतो.अतुल काका पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते असल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संबंधित संस्थेच्या आवश्यक बाबींची गरज कशी पूर्ण करता येईल व गरजूना जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल याचे नियोजन व कार्यवाही करण्यात अतुलकाकांचा हातखंडा आहे हे प्रकर्षाने जाणवले.नुकतीच अतुल काकांनी अहमदनगर जिल्ह्यातील निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण नियंत्रण मंडळ, सुरेगांव ह्या स्वयंसेवी संस्थेला त्यांच्या कामकाजा तील अडचणींचा विचार करून संस्थेला अद्ययावत संगणक प्रणाली,प्रिंटरची मदत व सहकार्य केले.  
     
          
     तसेच विविध महीला स्वयंसेवी संस्था व अनेक सामाजिक विकास संस्थांतील महिलांसाठी सुमारे एक लक्ष तीस हजार सॅनिटरी नॅपकिनचे विनामूल्य वितरण केले आहे.याशिवाय बारामती परिसरातील बारा शाळा दत्तक घेऊन शैक्षणिक विकास उपक्रम सुरू केला आहे. यापैकी ज्या शाळांमध्ये मुला मुलींसाठी शौचालय, वॉशरूम यांची गरज होती त्या शाळांना मुला-मुलींच्या उत्तम आरोग्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.तसेच ज्या शाळांना आधुनिक संगणक व इतर साहित्याची आवश्यकता होती त्या आधुनिक तंत्रज्ञान सुविधा पुरविल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली. शाळेतील मुला मुलींचे आरोग्याची काळजी घेतली. तसेच अंध व अपंग मुलांच्या विकासासाठी त्यांची गरज ओळखून अनेक सामाजिक संस्थेला मदतीचा हात पुढे केला आहे.

आचरणामध्ये कुठलीही तडजोड न करता कटाक्षाने सर्व नियम पाळतात

     तसेच जैन धर्मातील तत्वामध्ये आचरणामध्ये कुठलीही तडजोड न करता कटाक्षाने सर्व नियम पाळून आचरण ठेवणे याबाबत ते व्यक्तिशः अग्रही असतात व यामुळे ते अत्यंत समाधानी असल्याचे जाणवते.व्यवहारिक जगात कोणाचेही निंदा नालस्ती न करता प्रत्येकाला प्रत्येकाचे अस्तित्व असल्यामुळे त्यांच्या अस्तित्वाबद्दल कुठल्याही प्रकारचे दोषपूर्ण भाषण, संभाषण न करणे हे त्यांच्या अंगीभूत भिनलेले आहे. त्यांची कार्यालयीन कामकाजाची पद्धत अतिशय अनुकरणीय आहे.एखाद्या गोष्टीचा निर्णय घेण्या अगोदर त्याचा तपशीलवार अभ्यास करून, समय सुचकता ओळखून कामाचे व वेळेचे नियोजन कागदावर घेऊन नंतरच योग्य असा निर्णय घेण्याची त्यांची सवय असल्यामुळे प्रत्येक निर्णय हा सुयोग्यच ठरतो. आणि हेच यशस्वी उद्योगाचे गमक आहे हे जाणवते. मागील १८५ वर्षापासून चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा व्यवसाय सराफी व्यवसाय यशस्वी होण्यामागे प्रमुख्याने ट्रान्सपरन्सी व प्युअरिटी ह्या दोन गोष्टीचा प्रभाव जाणवतो. वडीलोपार्जित व्यवसाय सक्षमपणे व यशस्विपणे पुढे चालू ठेवण्यासाठी व अधिक गतीमान करण्यासाठी जेष्ठ चिरंजीव सिद्धार्थ शहा व कनिष्ठ चिरंजीव अदीत्य शहा यांनी अथ्थक परिश्रम घेऊन व्यवसाय चाणाक्षपणा सिद्ध केला आहे यांचा अनुभव येतो. एखाद्या विषयावर चर्चा करताना त्या विषयाचा  पूर्ण अभ्यास करून त्यातील मुद्दे एकत्रित करून एखाद्याला पटवून देण्यात त्यांचा हातखंडा आहे. दैनंदिन व्यवहारांमध्ये प्रांजळपणा तसेच नियमबद्ध व ठरवून दिलेल्या सिस्टम मध्येच काम करून घेण्याची त्यांची हातोटी उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे साधेपणा व बोलण्यातील मार्दवता, समजून सांगण्याची त्यांची कला, सुचवलेल्या गोष्टी स्वीकारण्याची मनाची तयारी इत्यादी गोष्टी या प्रकर्षाने जाणवतात.कितीही नावडती गोष्ट असली किंवा घटना घडली असेल तरी त्यावर शांत राहून विचार करून निर्णय घेण्याचे एक आगळीवेगळी कला त्यांच्या नसानसात भिनलेली जाणवते. खोटेपणाचा तर प्रचंड तिरस्कार. व्यवहार चातुर्य शुद्ध व स्वच्छ कारभार हे तर त्यांचे विशेष गुण आहे. याशिवाय माहिती व तंत्रज्ञान आपल्या व्यवसायामध्ये कसे वापरता येईल याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्याची त्यांची पद्धत उल्लेखनीय आहे. हार्ड वर्क करण्याऐवजी स्मार्ट वर्क करा असा सल्ला ते त्यांच्या सहकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सातत्याने देत असतात. प्रत्येक कर्मचारी हा कंपनीतील महत्त्वाचा घटक असून कर्मचारी काम करण्यासाठी प्रोत्साहित कसा होईल व सर्वार्थाने तो सुरक्षित कसा राहील याबाबत अतुल काका सातत्याने चिंतन व आवश्यकतेनुसार पाठपुरावा करीत असतात असे अनुभवले.माहिती आणि तंत्रज्ञानाची अंमल बजावणी सर्व बाबतीत व सर्व क्षेत्रात कसे वापरता येईल याबाबतचा विचार सातत्याने करत असतात. वेळेत बचत व कामात गती ही त्यांचे कार्यालयीन कामकाज आतील एक विशेष उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल.अतुल काकांची विचार शक्ती व आचार शक्ती या दोन्हीत एकाग्रता जाणवते. जसा विचार तसे आचारण. महिला सक्षमीकरण व्हावे अशी त्यांची प्रामाणिक इच्छा. विद्यमान सामाजिक परिस्थितीमध्ये महिलांचे अनेक प्रश्न असून ग्रामीण भागातील महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यासाठी दुर्बल घटकातील व ग्रामीण भागातील महिला स्वावलंबी होण्यासाठी उद्योजकता प्रकल्प उभा करून अनेक महिलांना काम देण्याचे प्रक्रिया त्याने नुकतीच सुरु केली आहे. स्वावलंबनता, सक्षमता आणि सातत्यता ह्या 3S चे नियोजन सातत्याने चालू असते. सराफ व्यवसायाबरोबरच प्रत्येकाने स्वावलंबी व्हावे ,सक्षम व्हावे असे त्यांचे प्रयत्न सातत्याने असतात. स्वत: सधन असले तरी निर्धन समजून समाजा साठी तळमळीने सर्वांगीण विकासासाठी काम करणे यासाठी अतुल काकांचे सातत्याने प्रयत्न असतात कोणत्याही प्रकारचा विकल्प मनात ठेवत नाही. कसल्याही प्रकारची कोणाकडूनही अपेक्षा ठेवायची नाही किंवा कोणत्याही गोष्टीत आपले मन गुंतवायचे नाही त्यामुळे मनात विकल्प येतो व त्याचा विपरीत परिणाम अनुभवास येतो हा त्यांचा विचार. मानवी जीवनातील अंतिम सत्य साध्य करावयाचे असेल तर त्यासाठी निरपेक्ष भावनेने कार्यरत राहणे व आपल्यावरचे उत्तरदायित्व पार पाडणे व समाजोपयोगी कामे करणे याशिवाय पर्याय नाही असे त्यांचे मत.


     अतुलकाकांच्या अर्धांगिनी सौ संगीता भाभीनां लहानपणीच शेतीचे बाळकडू मिळाल्यामुळे शेतीची आवड निर्माण झाली व परंपरागत शेती करण्याऐवजी आधुनिक शेती करण्याचा त्यांचा आग्रह व प्रयत्न उल्लेखनीय आहे. यातूनच सेंद्रिय शेती‌ मध्ये परिवर्तन करून विषमुक्त विविध अन्नधान्याचे उत्पादन सुरू केले. कोणतीही रासायनिक खते न वापरता सेंद्रिय पद्धतीने ऊस उत्पादन सुरू केले.यासाठी अतुलकाकांचे सौ संगीता भाभीना सेंद्रिय शेती करण्यासाठी मौलिक मार्गदर्शन व योगदान लाभले. सौ.संगीता भाभींच्या मार्गदर्शनाखाली व काकांच्या सहकार्याने सेंद्रिय शेती पद्धतीचा सखोल अभ्यास करून सेंद्रिय शेतीसोबतच शेती उपयुक्त विविधता प्रकल्पांची उभारणी व अंमलबजावणी संगिता भाभींनी अतुल काकांच्या खांद्याला खांदा लावून विषमुक्त व शुद्ध अन्नधान्य उत्पादन करण्याचा प्रयोग सुरू केला आहे. संगीता भाभींनी दैनंदिन व्यवहारास अध्यात्माची जोड असावी ह्यासाठी प्रतिमाधारी बनून व्रतस्थ जीवनाची वाट स्विकारली आहे. हे अतिशय कौतुकास्पद आहे.


     चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा.लि.बारामतीचे  आदरणीय अतुलकुमार जीनदत्त शहा उर्फ अतुल काका सराफ, बारामती यांचे रूपात एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा व आदर्श जीवनाचा मागील तीन वर्षांपासून साथीदार बनण्याचे सद्भाग्य मला लाभले याबद्द्ल मी स्वत:ला धन्य व माझेवर परमेश्वरी कृपा समजतो. म्हणून "येथे कर माझे जुळती."


लेखक: बाळकृष्ण कुलकर्णी,बारामती
 
Top