ग्रामीण व शहरी भागातील शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सोडियम हायपोक्लोराईडने सॅनिटाइज करून घ्यावी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक साहित्य जिल्हा परिषदेच्या सेस फंडा तून खरेदी करून देण्याबाबत झेडपी प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी-- डॉ नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

      पुणे,दि.२८ डिसेंबर २०२०- ग्रामीण व शहरी भागातील शाळा सुरू करण्यासंदर्भात आज शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी,पालक आणि संस्थाचालक यांच्यासमवेत दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक उपसभापती कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आली होती.

याबाबत शिक्षण विभागाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा

       त्यावेळी उपसभापती ना.डॉ नीलम गोऱ्हे म्हणाल्या,की पालक व शिक्षण संस्थांनी शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक रहावे व ऑनलाईन शिक्षणाचा फायदा घ्यावा. ज्यांना पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांनी फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा द्यावी. राज्याच्या बोर्ड परीक्षेला जसे फॉर्म नंबर १७ चालतो तसा तो सीबीएसई,आईसीएससी शाळा बाबत चालेल का याबाबत शिक्षण विभागाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा अशी सूचना देखील डॉ.गोऱ्हे यांनी शिक्षण विभागास केली.

मान्यता नसलेल्या शाळा सुरू करणे हा गंभीर गुन्हा

       जिल्हा परिषदेच्या सेस फुंडातून शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक सोडियम हायपोक्लोराईड खरेदी करावे व त्याचे मिश्रण फवारावे असे ही डॉ.गोऱ्हे यांनी ग्रामविकास विभागास सूचना दिल्या. मान्यता नसलेल्या शाळा सुरू असल्या बाबत पिंपरी चिंचवड येथील पालकांनी मुद्दा उपस्थित केले. त्यावर डॉ गोऱ्हे यांनी पुढे सांगितले की, मान्यता नसलेल्या शाळा सुरू करणे हा गंभीर गुन्हा असून याबाबत तात्काळ फौजदारी गुन्हा नोंद करावा व शिक्षण विभागाला कळवावे. शिक्षण विभागाने तात्काळ कारवाई करावी असे निर्देश दिले. मुले, शिक्षक व पालक यांचे मानसिक आरोग्य सर्वानी जपावे. शाळांनी तापमान मोजण्या साठी थरमामीटर,ऑक्सिजन लेवल तपासण्या साठी ऑक्सिमिटर घ्यावे असे निर्देश दिले. ज्या शाळांनी शासनाच्या सूचना डावलून फी वाढ केली आहे त्या पालकांनी शिक्षण विभागास कळवावे. उच्च न्यायालयात शाळांनी कोरोना काळात फी वाढ करु नये याबाबत चाललेल्या दाव्यात राज्य सरकारने या महागड्या इंग्रजी शाळांची ऊदाहरणे वापरता येतील कां हे तपासून घ्यावे असेही उपसभापतींनी शिक्षणविषयक सचिवांना सुचविले.

आवश्यक काळजी घेऊन शाळा सुरू करण्यास परवानगी

      श्रीमती वंदना कृष्णा अतिरिक्त मुख्य सचिव,शालेय शिक्षण यांनी १० नोव्हेंबर २०२० चे शिक्षण विभागाचे परिपत्रक स्पष्ट असल्याने आवश्यक काळजी घेऊन शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे सांगितले.ज्या मुलांना ऑन लाइन शिक्षण मिळाले नाही तरीही त्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी फॉर्म नंबर १७ भरून द्यावा व परीक्षा द्यावी असे सांगितले. सर्व मुलांना वापरता येईल अशी आँनलाईन लिंक व परीपत्रकेही त्यांनी दिली.

   डॉ प्रदीप व्यास, प्रधान सचिव आरोग्य यांनी सर्व शाळा सुरु करण्यासंदर्भात कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले . सक्रिय रुग्ण राज्यात फक्त ६ जिल्ह्यात आहेत व त्यांची संख्याही खूपच कमी आहे.पालक,शिक्षक यांनी काही नियमावली पाळणे गरजेचे आहे असे सांगितले. शिक्षक अथवा विद्यार्थी जर आजारी असल्यास कोणीही शाळेत येऊ नये,शाळेत पुरेशी हवा खेळती राहील हे पाहावे व शाळा सॅनिटाइज करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईडचे मिश्रण करून गावात व शाळेत फवारावे असे सांगितले. हे औषध स्वस्त असून  ग्रामपंचायत व जिल्हा परिषद त्यांच्या सेस फंडातून खरेदी करू शकते असे संदेश भांडारकर, कक्ष अधिकारी, ग्रामीण विकास विभाग यांनी स्पष्ट केले. यासाठी ५% जि.प.निधी शाळा दुरुस्तीसाठी वापरता येईल असे परिपत्रक ११फेब्रुवारी २०२० ला काढण्यात आले होते.त्यातच उपसभापतींच्या सुचना स्विकारुन सँनीटायझर सामग्रीस अनुमती देण्याबाबत खास बाब करता येईल असे त्यांनी सांगितले.

      संस्था संचालक संघटनेच्यावतीने भाऊ कोरगावकर यांनी शाळां दोन सत्रात असल्याने सॅनिटीझशन पुन्हा पुन्हा करावे लागते त्यामुळे शाळांचा खर्च वाढला आहे म्हणून शासनाने विशेष आपत्ती अनुदान द्यावे.ऑनलाईन शाळांसाठी वंचित मुलांना प्राधान्य द्यावे असे मुद्दे मांडले. 

पुणे शहरातील पालक संघटनेचे अध्यक्षा जयश्री देशपांडे यांनी ट्युशन फी भरायला पालक तयार आहेत मात्र फी भरण्यासाठी हप्ते पाडून द्यावेत व फी भरण्यासाठी संस्था चालकांनी दबाव आणू नये असे सांगितले. शाळेच्या विरोधात पालकांच्या तक्रारी घेऊन गेल्यानंतर शाळा पालकांवर खोट्या तक्रारी दाखल करतात. तसेच या शाळांनी शिक्षण विभागा कडे व चॅरिटी कमिशनर यांच्याकडे ऑडिट रिपोर्ट सादर केलेले नाहीत त्यामुळे या शाळा शासनाने ताब्यात घ्याव्यात असे सांगितले.या शाळांवरती नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने कायद्यांमध्ये सुधारणा करावी.शिक्षकांच्या पगारावर जमा होणाऱ्या फी मधून किती खर्च केला जातो ही तपासणी आवश्यक आहे असे सांगितले. 

      सुरेंद्र दिघे,सरस्वती मंदिर ठाणें या संस्था चालकांनी असे मांडले की, कोणतीही संस्था पालकांना फी भरण्यासाठी त्रास देत नाही. 

     पंकज पोटदुखे,संजय जोशी,कालिदास जाधव व प्रकाश जनबंधु यांनी शाळा फीबाबत संस्था चालक त्रास देत असल्याचे सांगितले. 

    श्री.यावलकर संचालक, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी शिक्षकांनी शिकविताना मास्क घातलाच पाहिजे. वेळोवेळी मुलांची तापमान व ऑक्सिजन तपासणी करावी. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा संघ स्थापन करून त्यांची मदत घ्यावी. पालक व शिक्षक चे व्हाट्स आप ग्रुप तयार करून समन्वय साधावा असे सुचविले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या सुरक्षिततेसाठी झेडपी प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी- डॉ नीलम गोऱ्हे 
zp administration should take appropriate action for the safety of children against the backdrop of corona- dr.neelam gorhe
 
Top