पंढरपुरात युवक कॉंग्रेसने काढली शेतकरी विधेयकाची अंत्ययात्रा

पंढरपूर,०७/१२/२०२० - महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे व जिल्ह्याचे प्रभारी गणेश जगताप यांच्या आदेशानुसार केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्याची आज सोमवारी पंढरपूर शहरात युवक कॉंग्रेसच्या वतीने शेतकरी विधेयकाची अंत्ययात्रा काढून त्याचा जाहीर निषेध करत सदरचे कायदे रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

   यावेळी कॉंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष ऍड.राजेश भादुले, सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेस महासचिव शंकर सुरवसे, पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष पिंटू भोसले, उपाध्यक्ष कृष्णा कवडे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन शिंदे, तालुका कार्याध्यक्ष मिलिंद भोसले, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समीर कोळी,सेवा दल शहराध्यक्ष गणेश माने, शहराध्यक्ष मधुकर फलटणकर,सागर कदम,अभिषेक शहा, महिला कॉंग्रेसच्या वनिता बनसोडे यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top