पंढरपूर,२७/१२/२०२०- गादेगांवचे यशवंतराव दत्तात्रय यादव यांना टाटा सामाजिक विज्ञान संस्था (Tata Institute of Social Sciences-TISS/टीस), मुंबई या नामवंत विद्यापिठाची पी.एच.डी. (डॉक्टरेट) मिळाली आहे.   शनिवारी(१९ डिसेंबर २०२०)मुंबई येथे झालेल्या पदवीदान समारंभात Convocation त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.कोविड-१९ उद्रेकामुळे हा पदवीदान समारंभ ऑनलाईन (vertual) घेण्यात आला.      ‘माहिती तंत्रज्ञान (Information Technology-IT) आणि फळशेती: पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याचा अभ्यास’ या विषयावरील प्रबंध (Thesis) त्यांनी टीस (TISS) विद्यापिठाच्या ग्रामीण विकास विभागाला सादर केला होता. यासाठी त्यांना टीस विद्यापिठातील प्रोफेसर डॉ. पी. गोपीनाथ यांचे मार्गदर्शन लाभले.

     यशवंतराव यादव हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय शामराव यादव गुरुजी यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.

गादेगांवच्या यशवंतराव यादव यांना ‘टीस’ विद्यापिठाची डॉक्टरेट Yashwantrao Yadav of Gadegaon received his doctorate from Tees University
 
Top