जागतिक दिव्यांग दिन अंधशाळेत साजरा

  पंढरपूर,०३/१२/२०२०,(प्रतिनिधी)-शासनाच्या आदेशानुसार करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून मर्यादित अंध मुलांच्या व पालकांच्या उपस्थितीत जागतिक दिव्यांग दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. 

 या कार्यक्रमात दिव्यांगांची देवता हेलन केलर,लुई ब्रेल आणि शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या प्रतिमेचे पूजन लायनेस क्लब पंढरपूरच्या अध्यक्ष डॉ.सौ. पल्लवी माने व सचिव सौ.जयश्री येलपल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. प्रस्ताविक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षक संतोष बाराहाते यांनी केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन विशेष शिक्षिका सौ रोहिणी घोडके यांनी केले. उपस्थित दिव्यांग मुलांना व त्यांच्या पालकांना पाहुण्यांनी मनोगतातून नियम पाळण्यास सांगितले त्यानंतर उपस्थितांना गुलाब पुष्प देऊन आणि शैक्षणिक साहित्य देऊन शुभेच्छा देत सत्कार केला. या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 
Top