भांडवलदारांचे हित जोपासणार्या केंद्र सरकारला जाग येत नसल्याने 

 

पंढरपूर, ०८/१२/२०२०,(नागेश आदापूरे) - आजच्या या आठ तारखेच्या देशव्यापी भारत बंदला महाराष्ट्रमधून स्वाभिमानी शेतकरी, बळीराजा,जनहित शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेडसह काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,मनसे, भारतीय राष्ट्रवादी पक्षाचेवतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.केंद्र सरकारने लागू केलेले जाचक कृषी कायदे रद्द करण्यासाठी मंगळवारी आठ डिसेंबर रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आलेेला आहे.केंद्र सरकारने केलेले नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांसाठी जाचक ठरू लागले आहेत. शेतकऱ्यांना मारक आणि भांडवलदारांच्या हिताचे कृषी कायदे रद्द करण्यात यावे यासाठी देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत तरी भांडवलदारांचे हित जोपासणार्या केंद्र सरकारला जाग येत नसल्याने आठ डिसेंबर मंगळवार रोजी कृषी कायदे रद्द करण्यासाठी विविध शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांनी देशव्यापी बंद पुकारला होता.

बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळणवर, जनहित शेतकरी संघटनेचे सचिन आटकळे,  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, शहाजहान शेख, बाहुबली सावळे, तानाजी बागल राष्ट्रवादी काँग्रेसचे साधना राऊत ,अनिता पवार, काँग्रेसचे प्रकाश पाटील,अँड राजेश भादुले,सागर कदम, सामाजिक संघटनांचे अरुण कोळी,संभाजी ब्रीगेडचे किरण घाडगे आदी उपस्थित होते. 


    यावेळी पंढरपूर विभाग शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव,शिवसेना तालुकाप्रमुख महावीर देशमुख,शहर प्रमुख रवींद्र मुळे ,शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हा प्रमुख सिद्धनाथ कोरे, उपशहर प्रमुख लंकेश बुराडे, विनय वनारे, सचिन बंदपट्टे, शिवसेना विभाग प्रमुख पंकज डांगे कोळी, ईश्वर साळुंखे, दिपक इंगोले, जितू ठाकूर, युवासेना पंढरपूर शहर समन्वयक अमित गायकवाड तसेच शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.
 
Top