स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते होणाऱ्या तीन महापूजा त्यांच्या कुटूंबियांच्या हस्ते पुर्वीप्रमाणेच चालू करा-दत्तात्रय बडवे

पंढरपूर,१४/१२/२०२० - ज्याप्रमाणे आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व कार्तिकीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरकारी महापूजा होते त्या पध्दतीप्रमाणे ज्यांनी खडतर प्रसंगातही देशाच्या हितासाठी प्रसंगी जेलमध्ये गेले व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या पंढरपुरातील स्थानिक स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते २६ जानेवारी,१ मे,१५ ऑगस्ट या तीन दिवशी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या खर्चाने विठ्ठलाची व रूक्मिणीची महापूजा होत होती परंतू खर्च कोणी करायचा यामुळे सदरच्या ३ महापूजा कालांतराने बंद झाल्या. याबाबत अधिक माहिती घेतली असता वरील वादामुळे पुजा बंद झाल्याचे समजते.

  आज झालेल्या चर्चेमध्ये स्वातंत्र्यसैनिक कुटूंबिय दिपक वसंतराव भोसले व मिलिंद पुरूषोत्तम अढवळकर यांनी सदरच्या पुजा पुन्हा चालू कराव्यात अशी मागणी करत तुम्ही सदरची मागणी शासनाकडे मांडा अन्यथा आम्ही सर्व स्वातंत्र्यसैनिक कुटूंबीय मंडळी ८ दिवसानंतर उपोषणाला बसणार आहोत असे सांगितले . 

    नवीन परंपरा मंदिर समितीने चालू केल्या मात्र  स्वातंत्र्य सैनिकांच्या पुजा बंद केल्यामुळे स्वातंत्र्य सैनिक कुटूंबियांमध्ये मंदिर समितीबद्दल नाराजी पसरलेली आहे. तरी स्वातंत्र्य सैनिक कुटूंबियांच्या हस्ते मंदिर समितीच्या खर्चाने वरील तीन दिवस महापूजा सुरू कराव्यात तसा निर्णय घेण्याचा शासनाला अधिकार आहे तरी सदरच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी सोलापूर जिल्हा कॉंग्रेस ब्राह्मण सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय बडवे-शिंदे यांनी निवेदनाद्वारे खा.शरद पवार,अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ,मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे साहेब,सहअध्यक्ष श्री वि.रू.मंदिर समिती पंढरपूरचे ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर व आमदार प्रणिती शिंदे, सोलापूर यांच्याकडे केली आहे.
 
Top