कुर्डुवाडीत पोलिसांकडून वाहन तपासणी

कुर्डुवाडी,(राहुल धोका),१४/१२/२०२०-कुर्डुवाडी शहरात व्यापारी वर्गावर पाळत ठेवुन त्यांना लुबाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर शहरात विविध ठिकाणी बॅरीकेट लावण्यात येत आहेत. रात्रीच्या गस्त वाढवण्यात आल्या असून प्रत्येक चौकात होमगार्ड व पोलिस यांच्या नियुक्ति करण्यात आल्या आहेत.
 
   शहरात ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना दक्षता घेण्याच्या सुचना देणारी दंवडी नगरपरिषद व पोलिसांकडून देण्यात येत आहे.१५ दिवसांपासून  सलग गुन्हेगारींच्या घटना घडू नयेत यासाठी विविध उपाययोजना चालू आहेत.


 शहरातील मागील घटनेतील आरोपींना पकडण्यात आम्हाला यश आले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चोर्यांचे प्रमाण वाढलेले आहे. कोणत्याही प्रसंगात कसलीही संशयास्पद गोष्ट वाटली तर तत्काळ पोलिस ठाणेकडे संपर्क करावा असे आवाहन पोलिस निरिक्षक -रविंद्र डोंगरे,कुर्डुवाडी यांनी केले आहे. 
  शहरात व्यापारीवर्गाने वेळेवर दुकान बंद करावे, मोठी रक्कम‌ असेल तर सुरक्षा रक्षक सोबत ठेवावा,सिसिटीव्हीचा वापर करावा, घरी जाताना मोठी रक्कम असल्यास पोलिसांची मदत घ्यावी अशी ध्वनीफित तयार करुन ती सोशल मिडीया वरही टाकण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संशयित विविध वाहनांची तपासणीही करण्यात येत असल्याची माहिती पोलिस निरिक्षक रविंद्र डोंगरे यानी दिली आहे.
 
कुर्डुवाडीत पोलिसांकडून वाहन तपासणी Vehicle inspection by police in Kurduwadi on the background of theft
 
Top