कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात रक्तदान शिबिर

पंढरपूर - रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय यांच्या सहकार्याने महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन प्राचार्य डॉ.कुंडलिक शिंदे यांच्या हस्ते झाले. या शिबिरात 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले. एन.सी.सी. विभाग प्रमुख डॉ. समाधान माने,डॉ.राजेंद्र जाधव,सिनियर अंडर ऑफिसर शुभम नागटीळक, रुकय्या शेख,समृद्धी शिवशरण,एन.सी.सी.चे माजी विद्यार्थी विजय शेटे, रिना रुपनर यांचा रक्तदात्यात समावेश होता.

अविष्कार अर्थमंच,आर्थिक जगत,भावतरंग, संगणक विश्व व युरेका या भित्तीपत्रकांचे प्रकाशन

यावेळी सिव्हिल हस्पिटल सोलापूरचे समाजसेवा अधीक्षक राजू माने, कॉटेज हॉस्पिटल पंढरपूरचे विनायक सावंत, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ राजाराम राठोड, ऑफिस प्रमुख अनंता जाधव, अभिजित जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कुंडलिक शिंदे यांच्या हस्ते अविष्कार अर्थमंच,आर्थिक जगत,भावतरंग, संगणक विश्व व युरेका या भित्तीपत्रकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रसिद्धी विभाग प्रमुख डॉ.दत्तात्रय डांगे,प्रा.तुकाराम अनंतकवळस, प्रा. गजानन गायकवाड, प्रा.संतोष शहाणे, प्रा.किशोर शिंदे,प्रा.परमेश्वर दुधाळ,प्रा.राजाराम गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते.


बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण

रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.अंजीर,चाफा, ख्रिसमस ट्री, क्रोटान, गुलमोहर,सप्तपर्णी,वड,पिंपळ,चिंच आदी वृक्षांचा यात समावेश आहे.राष्ट्रीय सेवा योजना व वनस्पती शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. रा.से.योजनेचे चेअरमन प्रा.दादासाहेब हाके, डॉ.मारुती सातपुते, डॉ.भारत सुळे, प्रा.अमोल मोरे व प्रा.सुमन केंद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.


महाविद्यालयातील या कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ.निंबराज तंटक, उपप्राचार्य डॉ. लतिका बागल, उपप्राचार्य चंद्रकांत रासकर,अधिष्ठाता डॉ. तानाजी लोखंडे, रुसा समन्वयक डॉ.बजरंग शितोळे, आयक्यूएसी समन्वयक डॉ.अमर कांबळे, स्वायत्त महाविद्यालय समन्वयक डॉ.मधुकर जडल, सिनिअर विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते.


माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रम Various programs on occasion of birthday of former Agriculture Minister Sharad Pawar
 
Top