पंढरपूर,२७/१२/२०२०-"वै.निवृत्ती महाराज वक्ते (बाबा)यांचे संपुर्ण जीवन हे अंतर्बाह्य पवित्र होतं.त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे" असे उद्गार ह.भ.प. डाॅ.जयवंत महाराज बोधले यांनी काढले.ते वक्ते महाराज यांच्या पंढरपुर येथे अस्थिकलश पूजन कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.


    नुकतेच वारकरी संप्रदायातील भिष्माचार्य म्हणून ओळख असलेले,महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार प्राप्त झालेले , संत वाङमय,व वेदांताचे गाढे अभ्यासक धर्मभास्कर वेदांताचार्य ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते यांचे वृद्धापकाळाने त्यांचे गावी टाकळी हाट जि. बुलढाणा(विदर्भ) या ठिकाणी वैकुंठगमन झाले.


     पंढरपूर स्थित परंपरागत फडकरी,मठाधिपती, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. याकरिता काल त्यांचा अस्थिकलश श्रीक्षेत्र पंढरपूर येथे सर्वांचे दर्शन व पुजनार्थ श्रीसंत मुक्ताबाई मठात आणण्यात आला होता. पुजन व श्रद्धांजली सभेनंतर अस्थिंचे श्री विठ्ठल मंदिराला प्रदक्षणा घालून श्री पुंडलीकराय मंदिरा जवळ चंद्रभागेच्या पात्रात विधीवत विसर्जन करण्यात आले.

      याप्रसंगी पूजन व श्रद्धांजली वाहणेसाठी आलेल्या सर्वच मान्यवरांनी वक्ते महाराजांचे वारकरी संप्रदाय कार्य, धर्मपालन,पाखांड खंडण, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यास केलेला कडाडून विरोध,प्रखर लेखणी व वक्तृत्व अशा विविध आठवणींना उजाळा देत असे व्यक्तिमत्व 'आता ऐसे होणे नाही' त्यांचे कार्य सर्वांनी पुढे चालू ठेवणे हिच त्यांना खरी श्रद्धांजली अशा भावना व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

      याप्रसंगी सर्वश्री ह.भ.प.बाळासाहेब महाराज बडवे, विरेंद्रसिंह उत्पात,देवव्रत(राणा) महाराज वासकर,विठ्ठल महाराज चवरे, विठ्ठल महाराज नामदास,जयवंत महाराज बोधले,विष्णू महाराज कबीर, सोपान काका टेंभूकर,भागवत महाराज चवरे,भाऊसाहेब महाराज गोसावी,नामदेव महाराज लबडे,भानुदास महाराज चातुर्मास्ये,शाम महाराज उखळीकर, विठ्ठल महाराज पैठणकर, जगन्नाथ महाराज देशमुख ,रघुनाथ महाराज कबीर,नागेश महाराज बागडे,विष्णु महाराज टेंभूकर, हरिदास महाराज,ज्ञानेश्वर महाराज नंधानकर,मयुर महाराज बडवे, गोपाळ महाराज ठाकूर, भागवत महाराज शिरवळकर, बाबुराव महाराज वाघ, मारुती महाराज तुणतुणे, सुभाष महाराज वाघमोडे,विनोद महाराज, रामकृष्ण बीडकर,विवेक बेणारे,अभयसिंहराजे इचगांवकर, बाळकृष्ण डिंगरे,विवेक बेणारे रविंद्र साळे,गणेश लंके, रामकृष्ण हनुमंत महाराज वीर व घुंडरे आळंदी, तसेच श्रीसंत मुक्ताबाई संस्थानचे पंढरपुर व्यवस्थापक शशिकांत पाटील यांसह वारकरी संप्रदाय पाईक संघ,स.वा.फडकरी दिंडी समाज संघटना,राष्ट्रीय वारकरी परिषद,विश्व वारकरी सेना, हिंदू महासभा,.विश्व हिंदू परिषद, पेशवा युवा मंच, हिंदू जनजागृती समिती यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

         या संपुर्ण कार्यक्रमात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले.

वै.वक्ते महाराजांचे संपुर्ण जीवन अंतर्बाह्य पवित्र- जयवंत बोधले महाराज 
vai vakte maharaj's entire life is internal and external sacred - jaywant bodhale maharaj
 
Top