लस पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय व खाजगी आरोग्य विभाग निगडितांना


पंढरपूर, १२/१२/२०२०- जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पंढरपूर दौरा केला.प्रांत कार्यलयात आयोजित केलेल्या तालुका कोरोना लसीकरण कृतिदल समिती सभेमध्ये उपस्थित राहून या लसीकरण करावयाच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय व खाजगी आरोग्य विभाग निगडित सर्व आरोग्य सेवा देण्याशी संबधित डॉक्टर्स व कर्मचारी तसेच मेडिकल दुकानदार,प्रयोगशाळा कर्मचारी, नर्सिंग मेडिकल विद्यार्थी यांनी लसीकरण करण्याबाबत त्वरित माहिती प्रांत ऑफिस वॉर रूममध्ये द्यावी.फक्त पूर्व नोंदणी असणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचारी यांनाच पहिल्या फेजमध्ये लसीकरण देण्यात येईल .नोंदणी नसणाऱ्या आरोग्य विभागातील डॉक्टर कर्मचारी यांना देण्यात येणार नाही तसेच पुढे इतर फ्रंट लाईन कर्मचारी,५० वर्ष पुढे व्यक्ती ,मधुमेह रक्तदाब कॅन्सर व इतर दुर्धर आजाराच्या व्यक्ती यांची नोंदणी करून पुढील दुसऱ्या फेजमध्ये लस उपलब्धतेनुसार लसीकरण करण्यात येणार आहे असे सांगितले व त्या अनुषंगाने तयारी करिता सूचना दिल्या .

माझे गाव कोरोना मुक्त गाव मोहीम प्रभावीपणे राबवा


तसेच सर्व विभागांनी समन्वय ठेऊन Corona नियंत्रण करिता कामकाज करण्याबाबत सूचना दिल्या.माझे गाव कोरोना मुक्त गाव मोहीम प्रभावीपणे पंचसूत्रीचा अवलंब करून ग्रामीण भागामध्ये राबवावी तसेच शहर मध्येही त्याच पद्धतीने कार्यवाही करावी.भीती न बाळगता लवकरात लवकर टेस्टिंग करणे व त्वरित उपचार करून घेणे,संसर्ग कमी करणेकरिता प्रतिबंधात्मक मास्क वापरणे ,सामाजिक अंतर, हात स्वच्छ धुणे या बाबीची गंभीरपणे कार्यवाही आवश्यक जेणेकरून मृत्यू दर कमी करता येईल अश्या सूचना दिल्या आणि कामकाजाचा आढावा घेतला.तसेच आतापर्यंत झोकून देऊन तालुका स्तरिय समन्वय समिती अधिकारी तसेच आरोग्य विभागाने कामकाज केले त्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.


या बैठकीस प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनीही लसीकरण कार्यक्रमाबाबत खाजगी तसेच सरकारी आरोग्य विभाग,इतर सर्व विभाग,स्वयंसेवी संस्था यांनी पूर्ण समन्वय ठेऊन कामकाज करणे आवश्यक अश्या सूचना दिल्या जेणेकरून आपण Corona नियंत्रण तसेच लसीकरण अधिक प्रभावीपणे करू शकतो.

या बैठकीस पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम,गटविकास अधिकारी रविकिरण घोडके , नगरपालिका मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर , वैद्यकीय अधीक्षक,ima अध्यक्ष ,निमा व होमिओपॅथी प्रतिनिधी,लायन्स,रोटरी क्लब प्रतिनिधी,सर्व वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते .

      यावेळी Corona मुक्त गाव शपथ घेण्यात आली.या बैठकीमध्ये माहिती व आढावा सादरीकरण डॉ एकनाथ बोधले तालुका आरोग्य अधिकारी यांनी केले.

   तदनंतर महाआवास अभियान अनुषंगाने अपूर्ण घरकुल पूर्ण करण्यास आयोजित लोक न्यायालयात उपस्थित राहून मार्गदर्शन केले.स्वेरी कॉलेज येथे पंचायत समिती,पंढरपूर मधील सर्व विभाग प्रमुख,ग्रामसेवक,आरोग्य विभाग, बचत गट विभाग,आपले सरकार केंद्र चालक यांची आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

त्याचबरोबर स्वेरी कॉलेज येथे कोरोना टेस्टिंग् व जनजागृती कॅम्पला भेट दिली.बचत गट महिलांनी उत्पादित केलेल्या बचतगटाला भेट देऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले. उत्कृष्ट काम करणारे ग्रामसेवक,अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान केला.कामाबद्दल गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांचेही अभिनंदन करून तालुका सर्व योजना अमलबजावणीमध्ये आघाडीवर ठेवण्याबाबत सूचना दिल्या .

        कार्यलयीन शिस्त कामे वेळेत पूर्ण करणे शासकीय काम लोकसेवा म्हणून करण्याच्या सूचना कर्मचारी याना  दिल्या. यावेळी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके,सहायक गटविकास अधिकारी सुरेंद्र पिसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ एकनाथ बोधले,सर्व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.
 
Top