पंढरपूर शहर पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांनी अश्‍लिल भाषेत शिवीगाळ करत केला महिलेचा विनयभंग अशी तक्रार


      पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर शहर पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांनी कोळी समाजाच्या एका महिलेस अश्‍लिल भाषेत शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप इसबावी येथे वास्व्यास असलेल्या संबंधीत महिलेने केला असुन या घटनेची माहिती समजताच पंढरपूर शहरातील कोळी समाजातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व नेतेमंडळींनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व शहर पोलिस स्टेशन, डीवायएसपी कार्यालय, पोलिस अधिक्षक यांचेसह वरिष्ठ पातळीवर निवेदन देऊन संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करणेची मागणी केली आहे.

विनयभंग केला असल्याचा गंभीर आरोप पीडीत महिलेने केला

       याबाबत महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे अधिक माहिती दिली आहे.यात माझ्या मुलाने दि.०७ फेब्रुवारी २०१६ रोजी पंढरपूरमधील एका मुलीशी कायदेशीर विवाह नोंदणी करुन प्रेम विवाह केला होता. लग्न झाल्यानंतर ४ वर्षापासुन हा मुलगा व त्याची पत्नी घर सोडून गेले असुन ते सध्या या घरात राहत नाही. त्याचेशी आमचा कसलाही संबंध नाही. असे असतानाही दि.४ डिसेंबर २०२० रोजी मी व माझी मुलगी अशा दोघीच असताना आम्ही पोलिस असल्याचे सांगुन जावेद जमादार व प्रकाश मेटकरी हे दोघे आमच्या घराचे अंगणात आले व मला अतिशय घाणेरड्या भाषेत लज्जा उत्पन्न होईळ अशा अश्‍लिल भाषेत शिवीगाळ सुरु केली, तुझ्या मुलाला शहर पोलिस ठाण्यात हजर कर नाहीतर तुला पोलिस ठाण्यात नेऊ आणि... अशा प्रकारे धमकावुन माझा विनयभंग केला असल्याचा गंभीर आरोप पीडीत महिलेने केला आहे.

गृहराज्यमंत्र्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करु असे दिले आश्‍वासन

     ही घटना समजताच सर्व कोळी समाजातील कार्यकर्ते व नेतेमंडळीतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कोळी समाजाच्या एका महिलेस अशा प्रकारे तिच्या घरी जावुन अश्‍लिल भाषा वापरत तिचा विनयभंग करणार्‍या शहर पोलिस ठाण्याच्या या दोन्ही पोलीस कर्मचार्‍यांना तातडीने निलंबीत करुन त्यांच्या वर गुन्हे दाखल करुन घेऊन कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे नुकतेच पंढरपूर दौर्‍यावर आले होते तेंव्हा त्यांनाही निवेदन देण्यात आले. यावर गृहराज्यमंत्र्यांनी याची तातडीने दखल घेऊन वरिष्ठ पातळीवर चौकशी करुन आरोपींवर कठोर कारवाई करु असे आश्‍वासन दिले आहे. पंढरपूर शहर पोलिस ठाण्यातही निवेदन देण्यात आले. जर त्वरीत संबंधीत दोन्ही पोलिसांवर कारवाई केली नाही व पीडीत महिलेला न्याय मिळाला नाही तर संबंध राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल व होणार्‍या परिणामास शाासब जबाबदार राहील. असा इशाराही देण्यात आला. यावेळी कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुणभाऊ कोळी, महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊलीभाऊ हळनवर, सचिन अंकुशराव, सोनु अधटराव, विनायक संगीतराव, वैभव भुमकर,विनायक संगीतराव,प्रदिप अधटराव, शिवसेनेचे काकासाहेब बुरांडे,लंकेश बुरांडे,पंकज डांगे,पंकज सर्जे,संपत सर्जे,निलेश परचंडे,निलेश माने,गणेश अभंगराव,भैया ननवरे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top