पिपल्स डेव्हलपमेंट फाउंडेशन संस्थेच्यावतीने शिक्षक विद्यार्थी यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न

     शेळवे,(संभाजी वाघुले) - पिपल्स डेव्हलपमेंट फाउंडेशन संस्थेच्या वतीने ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालय, कुंजीरवाडी शाळेतील मुलांना सॅनिटायझर,बॉटल व पेन वाटण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने डॉ गणेश पवार उपस्थित होते.

  डॉ.गणेश पवार यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक माहिती देऊन मार्गदर्शन केले व शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करण्याचे सांगितले.कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्या साठी हात,स्वच्छ धुणे,सुरक्षित अंतर ठेवणे,मास्क चा वापर करणे तसेच आपल्या आजूबाजूला जर कोणाला सर्दी, ताप,खोकला किंवा इतर आजाराची लक्षणे दिसून आल्यास त्वरित दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध उपचार करून घेण्यास सांगितले.

    शाळेच्यावतीने प्रास्ताविक सौ मुखवटे मॅडम यांनी केले व आभार सौ सावंत मॅडम यांनी आभार मानले .यावेळी ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालय कुंजीरवाडीचे मुख्याध्यापक विजयकुमार गवळी सर,पर्यवेक्षक धनपाल आडमुठे सर,विद्यार्थी , सामाजिक कार्यकर्ते,पिपल्स डेव्हलपमेंट फाउंडेशन संस्थेचे खजिनदार रुग्णसेवक हरेश गोठे, संस्थेचे उपाध्यक्ष विजय रणदिवे व इतर शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

     पिपल्स डेव्हलपमेंट फाउंडेशन संस्थेच्यावतीने शिक्षक विद्यार्थी यांचे मनोबल वाढवण्यासाठी हे केले काम This was done on behalf of the People's Development Foundation to boost the morale of teachers and students पिपल्स डेव्हलपमेंट फाउंडेशन संस्थेच्यावतीने शिक्षक विद्यार्थी यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न


 
Top