जेष्ठ नागरिकांसाठीच्या "ताईंचा डब्बा" taincha Dabba सेवाभावी योजनेत अधिक पूरवठादारांनी सहभाग घेण्याचे डॉ.नीलमताई गोऱ्हे,Nilamtai gorhe विधान परिषद उपसभापती यांचे आवाहन
   पुणे,दि.१डिसेंबर २०२०- उपसभापती,विधान परिषद व मानद अध्यक्षा स्त्री आधार केंद्र ,डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या पुढाकाराने व स्त्री आधार केंद्र,पुणे, जनसेवा फाउंडेशन,पुणे व शिवसेना महिला आघाडी यांच्या सहयोगाने पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी 'ताईंचा डब्बा' ही संकल्पना राबवण्याचे ठरले होते.

आजाराचा पूर्व इतिहासनुसार व दर्जेदार जेवण देण्यासाठी लाभार्थ्याला डब्बे

    त्यानुसार दि २१ नोव्हेंबरपर्यंत जवळपास १३० जेष्ठ नागरिकांनी चौकशी केली.पूरवठादारांकडे आवश्यक मनुष्यबळ,शॉप ऍक्ट व अन्न व औषध प्रशासन या आवश्यक शासकीय परवानग्या आहेत याची तपासणी करून जेष्ठ नागरिकांना त्याचे घरी वेळेनुसार पथ्य,आजाराचा पूर्व इतिहासनुसार व दर्जेदार जेवण देण्यासाठी लाभार्थ्याला डब्बे पुरवण्याचे नियोजन करण्यात आले.

आज दिनांक १डिसेंबर २०२० रोजी या योजनेतून लाभार्थ्यांना डब्बे प्रायोगिक तत्वावर पाठवून योजनेची सुरुवात शिवाजी नगर,हडपसर, कोथरूड, कसबा पेठ, खडकवासला या विधान सभा क्षेत्रात करण्यात आली आहे.

सर्व जेष्ठ नागरिकांनी या योजनेत ना नफा ना तोटा तत्वावर मिळणाऱ्या या डब्ब्यांबद्दल ना.डॉ. नीलमताई गोऱ्हे यांचे आभार मानले असून वडगाव शेरी,पर्वती,पिंपरी, चिंचवड, एस.सी.,पुणे कँटोंमेंट, शिवाजी नगर, खडकवासला येथील अधिक पुरवठादारांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन ना.डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी केले आहे.

पुरवठादारांना व लाभार्थ्यांना काही प्रश्न असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

पुरवठादारांना व लाभार्थ्यांना काही प्रश्न असल्यास त्यांनी समन्वयक,योगेश जाधव ९०२८३३३३०५ किंवा जयवंत मंत्री,जनसेवा फाउंडेशन ९९२२६९१६७६, प्रवीण सोनवणे,स्त्री आधार केंद्र ७९७२७७०५३३ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .
 
Top