स्वाभिमानी शेतकरी संघटनेने श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावर बेमुदत धरणे आंदोलन

मंगळवेढा,१६/१२/२०२०,(नागेश आदापूरे) - पहिली उचल एकरकमी FRP व नंतर 14% वाढ व मागील थकीत ७४ रुपये बाकी त्वरित द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.


     स्वाभिमानी शेतकरी संघटनेने श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून चालु गाळप हंगामात एफआरपपी अधिक १४ % वाढ द्या या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे.

     पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल घुले,सोलापूर जिल्हाध्यक्ष तानाजी बागल,उपाध्यक्ष संतोष बिराजदार ,रणजित बागल,पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील,मंगळवेढा तालुक्यातील श्रीमंत केदार,दत्तात्रय पाटील, रोहित भोसले, हर्षराज डोरले,आबा खांडेकर,दत्तात्रेय बेद्रे,राहुल खांडेकर, धनाजी गडदे,चंद्रकांत पाटील,विठ्ठल साखरे, बाहुबली सावळे आदिसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव उपस्थित होते. 

 पहिली उचल एकरकमी FRP व नंतर 14% वाढ व मागील थकीत ७४ रुपये बाकी त्वरित द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू Swabhimani Shetkari Sanghatanas indefinite holding agitation started for this demand
 
Top