पत्रकारिता क्षेत्रात पत्रकार व अधिस्वीकृतीधारक पत्रकार असा भेदभाव अन्यायकारक

   

    कुर्डुवाडी,(राहुल‌ धोका),११/१२/२०२०-पत्रकारिता क्षेत्रात पत्रकार व अधिस्वीकृती धारक पत्रकार असा भेदभाव केला जात आहे तो अन्यायकारक असून सक्रिय पत्रकारिता करणाऱ्या सरसकट सर्व पत्रकारांना अधिस्वीकृतीधारक म्हणून मान्यता द्यावी,पत्रकार प्रवास करत असलेल्या वाहनांना टोल माफी मिळावी, कोरोना व्हायरस रोखण्यासाठी देण्यात येणारी कोरोना प्रतिबंधक लस पत्रकारांसाठी प्राधान्याने उपलब्ध करून द्यावी,शासकीय रुग्णालयात अधिस्वीकृती धारक असो अथवा नसो पत्रकारांमध्ये भेदभाव न करता सर्व पत्रकारांना मोफत आरोग्य सुविधा व औषधोपचार करण्यात यावेत अशा विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ माढा तालुक्याच्यावतीने प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्याकडे देण्यात आले आहे.

     दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,राज्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी पत्रकार भवन बांधून मिळावे,सर्व शासकीय इमारतीमध्ये स्वतंत्र पत्रकार कक्ष स्थापन करावे,यूट्यूब न्यूज चॅनेलची अधिकृत नोंदणी करून त्यांना पत्रकारिता क्षेत्रात सामावून घ्यावे,प्रत्येक तालुक्यात पत्रकार वसाहती निर्माण करून पत्रकारांना हक्काचे घर देण्यात यावीत, वयोवृद्ध पत्रकारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शन योजना लागू करावी,शासकीय नोकऱ्यां मध्ये पत्रकारांच्या कुटुंबातील व्यक्तींना प्राधान्य देण्यात यावे,राज्यातील शासकीय भूखंड पत्रकार बहुउद्देशीय संघांना सामाजिक उपक्रम राबविण्या साठी प्राधान्य देण्यात यावे,प्रत्येक तालुका व जिल्ह्यात पत्रकारांसाठी स्वतंत्र शासकीय विश्राम गृह उभे करावे,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सर्व पत्रकारांना शासनाच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात यावे, राज्यात वाळू माफिया व अवैद्य व्यवसायिक यांच्याकडून पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी, समाज कल्याण विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जात पडताळणी दाखल्यासाठी घातलेल्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात व विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच शासनाच्यावतीने जात पडताळणी प्रमाणपत्र व विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले उपलब्ध करून द्यावेत, शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्गात प्रवेश दिला मात्र दुसरे वर्ष संपत आले तरी त्यांना अद्यापपर्यंत गुणपत्रिका दिली नाही त्याबाबत असलेला संभ्रम दूर करण्यात यावा असे निवेदनात नमूद करण्यात आले

  यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सुहास कांबळे,जिल्हा संघटक अशोक खारे,जिल्हा उपाध्यक्ष शफिक शेख,माढा तालुकाध्यक्ष अंकुश आतकर, कार्याध्यक्ष वसंत कांबळे,उपाध्यक्ष अरबाज पठाण राहुल धोका,कालिदास जानराव,सचिव बाबाफरीद पठाण,श्रीनिवास बागडे,हनुमंत मस्तुद,हनुमंत जाधव आदी उपस्थित होते.
 
Top