पंढरपूर तालुका पोलीस अवैध व्यवसायांकडे करत आहेत दुर्लक्ष ?

    पंढरपूर,(प्रतिनिधी)- गेल्या अनेक दिवसांपासून पंढरपूर तालुक्यात अवैध व्यवसायकांनी डोके वर काढले असताना पंढरपूर तालुका पोलिस हे त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते आहे.पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये जुगार,मटका,गुटखा,दारू विक्री राजरोसपणे मोठ्या प्रमाणात खुलेआमपणे सुरू आहे.याबाबत नागरिकांमधून अशा अवैध व्यवसायकांवर तालुका पोलिस निरीक्षक दुर्लक्ष करत असतील तर पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे.अन्यथा आम्हास सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालया समोर लोकशाही मार्गाने उपोषण करण्याशिवाय पर्याय नसल्याचे नागरिकांमधुन बोलले जात आहे.

पोलिस अधिक्षक पथकाची पंढरपूर तालुक्यातील वाळू चोरांवर कारवाई

     पंढरपूर तालुका पोलिस स्टेशन परिक्षेञातील अनेक गावांमधिल अवैध व्यवसायीकांवर अंकुश नसल्याचे दिसत आहे.काल पंढरपूर तालुका पोलिस स्टेशनपासून काही कि.मी.अंतरावरील गोपाळपूर येथे सोलापूर ग्रामीण पोलिस अधिक्षकांच्या विषेश पथकाने ७५ कि.मी. वरून येऊन येथे खुलेआमपणे सुरू असलेल्या अवैध वाळु वाहतुकीतील वाहनावर कारवाई केली आहे त्यामुळे पंढरपूर तालुका पोलिस स्टेशनच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

      सोलापूर ग्रामीण पोलिस अधिक्षकांच्या विषेश पथकाची खुलेआमपणे सुरू असलेल्या अवैध वाळु वाहतुकीतील वाहनावर कारवाई 
special team of solapur rural superintendent of police cracks down on illegal sand transport vehicle
 
Top