तीव्र आंदोलन करत आले आंदोलकांनी टायर पेटविले

पंढरपूर,०८/१२/२०२० - केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी विधेयके आणलेली आहेत. यामुळे भविष्यात याचा फार मोठा त्रास शेतकरी बांधवांना होणार आहे याच्या निषेधार्थ आज संपूर्ण देशात भारत बंदची हाक देण्यात आली होती. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे पंढरपूर- सांगली मार्गावरील कासेगाव रोडजवळ एम.एस. ई.बी.शेजारी सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन नागणे नेतृत्वाखाली रास्तारोको करत तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी टायर पेटविले. अचानक आंदोलकांनी आक्रमक पत्रिका घेतल्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली.

यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन नागणे म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या अस्तित्वा वरच घाला घालण्याचे काम केलेले आहे. सध्या भाजपाचे नेते जरी या शेतकरी विधेयका विषयी गोड गोड बोलत असले तरी या शेतकरी विरोधी विधेयकांमुळे भविष्यात शेतकरी जमात नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यावेळी जिल्हाउपाध्यक्ष संदिप शिंदे,विधानसभा कार्याध्यक्ष सोमनाथ आरे, विधानसभा उपाध्यक्ष कृष्णा कवडे,समाधान पोळ,दिपक गोरे,जोतिबा शिंदे,सुरज शिंदे यांच्यासह युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top