सरपंच सेवा संघटनेच्यावतीने शिर्डी येथे सामाजिक युवारत्न पुरस्कार

पंढरपूर,(नागेश आदापूरे)-सरपंच सेवा संघाच्या वतीने शिर्डी येथे विविध क्षेत्रातील पुरस्कार वितरण सोहळा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,ह.भ.प.इंदूरीकर महाराज व आजी माजी आमदार खासदार यांच्या उपस्थितीमध्ये ६ जानेवारीला शिर्डी येथे सोहळा संपन्न होणार आहे.


सरपंच सेवा संघाच्यावतीने या वर्षीचा राज्य स्तरीय सामाजिक युवारत्न पुरस्कार शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांना जाहीर झाला आहे. शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेने ब-याच दिवसापासून समाजसेवा सामाजिक कार्य करत आहेत.

      शिवस्वराज्य युवा संघटना सामान्य जनतेला व बारा बलूतेदारांना केंद्रबिंदू मानून जनतेची सेवा करत आहे.कोरोना काळामध्येही शिवस्वराज्य युवा संघटनेच्या माध्यमातून एक महिना भाजीपाला व किराण किट मोफत वाटप केले आहे.कोरोना योद्धा गौरव सन्मानपत्र म्हणून तब्बल 25पुरस्कार शिवस्वराज्य युवा संघटनेला भेटले आहेत.


       लहान वयात चांगल्याप्रकारे सामाजिक कार्य व कामगिरी केल्याबद्दल सरपंच सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पावसे व युवक नेते नितीन काळे यांनी सरपंच सेवा संघटनेचा सामाजिक युवारत्न पुरस्कार जाहीर केला आहे.

      शिवस्वराज्य युवा संघटनेच्या कामाची पोचपावती म्हणून हा पुरस्कार असून तो मला नसून ज्यांनी शिवस्वराज्य युवा संघटनेचे महाराष्ट्रभर चांगले कार्य केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले त्यांचा पुरस्कार आहे,असे शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी सांगितले.

पुरस्कार स्वीकारण्यासाठी महाराष्ट्रातील व सर्व जिल्हातील सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

शिवस्वराज्य युवा संघटनेला सरपंच सेवा संघटनेच्यावतीने सामाजिक युवारत्न पुरस्कार social yuvaratna award on behalf of sarpanch seva sanghatana to shivswarajya yuva sanghatana 
 
Top