मोदी सरकारने सामान्य जनतेचे जगणे मुश्किल केले- शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे

  पंढरपूर,१२/१२/२०२० - गेल्या महिनाभरापासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे सातत्याने वाढत चालले असून पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली आहे.काही ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल एकाच दराने मिळत आहे.इंधनाचे दर वाढल्या मुळे सर्वत्र महागाईचा भडका उडणार असून कोरोनामुळे आधीच सर्वसामान्य जनतेचे जगणे मुशिक्ल असताना मोदी सरकार सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहे,अशी भावना व्यक्त करीत आज पंढरपूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने येथील गोपाळपूररोड येथील पेट्रोल पंपा समोर बोंबाबोंब आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला.

      याबाबत बोलताना शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे म्हणाले की ,केंद्र सरकार हे केवळ कार्पोरेट उद्योगपती,आंतराष्ट्रीय बडे गुंतवणूकदार यांचे हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेत आहे आणि यात सर्वसामान्य जनता मात्र भरडून निघत आहे.तेल कंपन्या ज्या दराने क्रूड ऑइल खरेदी करत आहेत त्यावर केंद्र सरकार कररूपाने दुप्पट तिप्पट कर वसुली करत आहे.गेल्या काही दिवसात पेट्रोल,डिझेल आणि गृहोपयोगी गॅसच्या दरात प्रचंड वाढ केली आहे.हि बाब सामान्य लोकांचे जगणे मुश्किल करणारी आहे.मात्र या बाबत न बोलता भाजपचे केंद्रीय मंत्री शेतकरी आणि सामान्य नागिरक यांच्याबाबत अवमानकारक व्यक्तव्ये करत आहेत.केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी तर कहरच केला असून आपली दानवी प्रवृत्ती दाखवलेली आहे.शेतकरी आपल्या हक्काच्या लढाईसाठी घरदार सोडून आंदोलन करीत असताना त्यांना खलिस्तानी, पाकिस्तान समर्थक अतिरेकी संबोधणे लाजिरवाणे आहे.यावेळी शिवसेनेच्यावतीने दानवे यांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.

      यावेळी शिवसेना सोलापुर जिल्हा प्रमुख, पंढरपूर विभाग संभाजीराजे शिंदे,जयवंत माने, शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख महावीर देशमुख, शिवसेना पंढरपूर शहरप्रमुख रविंद्र मुळे, शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश बुराडे,विनय वनारे, सचिन बंदपट्टे, बाबा अभंगराव,अवि वाळके, युवासेना शहर समन्वयक अमित गायकवाड,युवा सेना शहर प्रमुख महावीर अभंगराव,शिवसेना विभाग प्रमुख पंकज डांगे-कोळी,अरुण कांबळे,ईश्वर साळुंखे, गणेश वाघमारे, राघवेंद्र ऐनापुरे,शाखा प्रमुख विजय गंगणे,पिंटू रेड्डी,प्रणित पवार,सौरव चौगुले, प्रदीप बडवे,अपंगसेना शहराध्यक्ष शिवाजी कोष्टी, अमित अभंगराव, गणेश पवार,बसवेश्वर अभंगराव, अजय अभंगराव,बंटी यवनकर, सीताराम माने (तावशी ), गणेश घंटे, मारू धोत्रे, विट्ठल शिंगाडे, रवि शिंगाडे, रणजीत बंदपट्टे, प्रतापसिंह पवार, जितेंद्र ठाकुर,अक्षय गायकवाड,बाजी घाडगे, अजय हुलवडे, स्वप्निल शिंगाडे, सुजीत डोंबे, स्वप्निल शिंदे,सौरव नागटिळक,विशाल पाटोळे, अमित जमदाडे,अमित मुळे,छोटू ठाकुर,गणेश मुळे तसेच बहुसंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात पंढरपुरात पेट्रोल पंपासमोर शिवसेनेचे बोंबाबोंब आंदोलन ShivSenas bombing agitation in front of petrol pump in Pandharpur against petrol and diesel price hike 
 
Top