रेशन दुकानदारांच्या मनमानी कारभाराबाबत 

   

पंढरपूर,(नागेश आदापूरे),११/१२/२०२०- शिवक्रांती युवा संघटनेतर्फे नायब तहसीलदारांना रेशन दुकानदारांच्या मनमानी कारभाराबाबत निवेदन देण्यात आले.रेशन दुकानदार गोरगरीब जनतेला रेशन कार्डप्रमाणे माल देत नाहीत आणि  छापील पावतीसुद्धा देत नाहीत.दारिद्र रेषेखालील जनतेला जिथे सात किलोच्या पुढे माल द्यायला पाहिजे तिथे त्यांना माल कमी दिला जातो व त्यांना तुमचा माल एवढाच आहे असे सांगण्यात येते अशा तक्रारी संघटनेकडे आल्या आहेत.

आठ दिवसात तक्रार निवारण न झाल्यास त्याच्या  विरोधात आमरण उपोषण

  रेशन ऑनलाईन झाल्यामुळे काही कार्डधारकांना तर मालही मिळत नाही म्हणून रेशन दुकानदारांवर कारवाई व्हावी म्हणून निवेदन देण्यात आले.जर आठ दिवसात तक्रार निवारण न झाल्यास त्याच्या  विरोधात आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.यावेळी शिवक्रांती युवा संघटन संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे,शहर संघटक मंगेश श्रीखंडे,शहर प्रसिद्धीप्रमुख रंजीत सावंत,शहर उपाध्यक्ष विकी काळे,माऊली काळे, ऋषी अदापुरे आदी उपस्थित होते.

रेशन दुकानदारांच्या मनमानी कारभाराबद्दल शिवक्रांती युवा संघटनेचा आमरण उपोषणाचा इशारा Shivkranti Youth Organization warns of fast till death for action in ration scam
 
Top