राजकारणात सभ्यता व शिष्टाचार सांभाळण्याचे काम शरद पवार यांनी केले

      पंढरपूर,१२/१२/२०५०(नागेश आदापूरे)-"आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय नेत्यांपासून देशातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्वांशी जिव्हाळ्याचे व सलोख्याचे संबंध ठेवणारे शरद पवार हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील भीष्म पितामह होत. साहित्य कला क्रीडा व विज्ञान या क्षेत्रातील तज्ञ लोकांशी त्यांनी सहकार्य संबंध प्रस्थापित करून राजकारणात सभ्यता व शिष्टाचार सांभाळण्याचे काम त्यांनी केले. म्हणूनच शरद पवार हे सर्वांना आपलेसे वाटणारे नेते आहेत." असे प्रतिपादन प्रोफेसर डॉ. अजितानंद जाधव यांनी केले.


रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुसा कॉम्पोनंट आठ अंतर्गत राज्यशास्त्र विभागाच्यावतीने एक दिवसीय राष्ट्रीय वेब सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे हे होते.

शरद पवार कार्यकर्तृत्वाने,चिकित्सक बुद्धिमत्तेने मुत्सद्देगिरीने देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी

प्रोफेसर डॉ.जाधव पुढे म्हणाले की, "१९७० च्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केलेले शरद पवार आपल्या कार्यकर्तृत्वाने,चिकित्सक बुद्धिमत्तेने व मुत्सद्देगिरीने देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले दिसतात. सामान्य लोकांच्या मदतीला नैसर्गिक आपत्तीच्या वेळी धावून जाणारे राजकीय नेतृत्व म्हणून शरद पवार साहेब यांचा नावलौकिक आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांची सलोख्याचे संबंध ठेवून राजकीय पावित्र्य व शिष्टाचार जपण्याचे काम पवार साहेब करतात.


  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ.रवींद्र भणगे म्हणाले की, "शरद पवार यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याची वृत्ती साहेबांनी जोपासली आहे. 'भाकरी परतली नाही तर ती करपते' हे पवार साहेबांचे महत्त्वाचे वाक्य असून समाज जीवनामध्ये नव्या व्यक्तिमत्वाला नेतृत्वाची संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. कृषी-औद्योगिक समाज रचनेचे स्वप्न पवार साहेबांनी पाहिल्यामुळे महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा दिसून येतो."

ज्ञानावर आधारित समाज रचनेची निर्मिती करण्याचे स्वप्न पवार साहेबांनी पाहिले

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे म्हणाले की,"ज्ञानावर आधारित समाज रचनेची निर्मिती करण्याचे स्वप्न पवार साहेबांनी पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरवण्या साठी त्यांनी शैक्षणिक धोरणांना प्राधान्य दिलेले आहे. शेतकऱ्याच्या घरातला एक तरी मुलगा उद्योग,व्यापार व नोकरी या क्षेत्रात गेला पाहिजे. देशाच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती म्हणून पवार साहेब यांच्याकडे पाहिले जाते."

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.दत्तात्रेय काळेल यांनी केले. प्रमुख मान्यवरांचा परिचय प्रा.दादासाहेब फाळके यांनी करून दिला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.निंबराज तंटक, उपप्राचार्य चंद्रकांत रासकर,अधिष्ठाता प्रोफेसर डॉ.तानाजी लोखंडे, विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता डॉ.सुखदेव शिंदे,महाविद्यालय अंतर्गत सुधार समितीचे समन्वयक डॉ.अमर कांबळे,रुसा समन्वयक डॉ. बजरंग शितोळे, स्वायत्त महाविद्यालय समन्वयक डॉ. मधुकर जडल आदी उपस्थित होते. 

     या वेब सेमिनारमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक,अभ्यासक,समीक्षक व संशोधक सहभागी झाले होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तांत्रिक सहाय्य प्रा.राजेंद्र मोरे व प्रा.घनश्याम भगत यांनी केले.

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.भारती सुडके यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ.उमेश साळुंखे यांनी मानले.यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सदस्य आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश राजूबापू पाटील,प्रा.आर.डी.पवार ,पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे प्राचार्य डॉ के एच शिंदे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील ,हणमंत पवार,तालुकाध्यक्ष एडवोकेट दीपक पवार,श्री शेेेेळके,शहराध्यक्ष सुधीर भोसले, रणजीत पाटील,जिल्हा परिषद सदस्य अरुण खरात,अरुण आसबे,श्रीकांत शिंदे, कृष्णात माने,शहर उपाध्यक्ष गिरीश चाकोते,सचिन कदम,प्राध्यापक विजय गायकवाड सचिव विजय काळे,राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष संदीप मांडवे, रशीद शेख,मनोज आदलिंगे,युवराज भोसले, सचिन सोळंके,ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष साधना राऊत, जिल्हाध्यक्ष श्रेया भोसले,युवती प्रदेश संघटक चारुशीला कुलकर्णी, तालुका महिलाध्यक्ष अनिता पवार,युवती जिल्हा संघटक राधा मलपे,तालुकाध्यक्ष कीर्ती मोरे, युवती तालुका कार्याध्यक्ष सारिका गायकवाड, शहर उपाध्यक्ष हर्षाली परचंडराव,योगिता मस्के,विद्यार्थी शहर कार्याध्यक्ष अमृता शेळके,महिला शहराध्यक्ष संगीता माने ,सौ उमाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

     शरद पवार हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील भीष्म पितामह - प्रो.अजितानंद जाधव Sharad Pawar is Bhishma in the politics of Maharashtra and country - Prof.Ajitanand Jadhav
 
Top