चंद्रभागेच्या वाळवंटात महिलांसाठी चेंजिंग रूम उभारा- राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसची मागणी

         पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या वाळवंटात उभारण्यात आलेले महिला चेंजिंग रूम मागे येऊन गेलेल्या वादळी वाऱ्यात व महापुरात उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे चंद्रभागेचे पवित्र स्नानासाठी आलेल्या महिला भाविकांसाठी नव्याने कायमस्वरूपी 'चेंजिंग रूम' ची उभारणी करावी , अशी मागणी युवती कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे .

यासंबंधीचा योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल

       याबाबत राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे प्रदेश संघटक कु. चारुशीला कुलकर्णी व राधा मलपे यांनी विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांना मागणीचे निवेदन दिले आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी व तहसिल कार्यालय यांना देखील देणार असुन यासंबंधीचा योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती चारुशीला कुलकर्णी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल

अनेक वेळा निवेदन तक्रार देऊन पण जर कायमस्वरूपी चेंजिंग रूमची उभारणी केली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही चारुशीला कुलकर्णी व राधा मलपे यांचेसह राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

चंद्रभागेच्या वाळवंटात महिलांसाठी चेंजिंग रूम उभारा- राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसची मागणी
Set up a changing room for women in the chandrabhaga desert - Demand of NCP Yuvati Congress
 
Top