८० वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

 कुर्डूवाडी,(राहुल धोका),१२/१२/२०२०-कुर्डूवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने आज दिनांक १२/१२/२०२० रोजी उत्साहाने जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला.या निमित्ताने ८० वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.कुर्डूवाडीमधील ज्येष्ठ नागरिक,विठ्ठलमाई ज्येष्ठ नागरिक संघ,जिजामाता महिला ज्येष्ठ नागरिक संघ,घाटणे व लऊळ येथील ज्येष्ठ नागरिक संघांनी यात भाग घेतला.जेष्ठ नागरिक संघाचे सचिव अर्जुन गाडे यांनी सूत्र संचलन केले .शंकर सुतार यांनी प्रस्तावना केली व संघाचे कार्याची माहिती सांगितली.


     माजी कृषीमंत्री शरद पवार यांची ८० वर्ष पूर्ण झाल्याबदल वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा तसेच ग्लोबल पारितोषिक विजेते रणजितसिंह डिसले गुरूजी यांचा अभिनंदनाचा ठराव या कार्यक्रमामध्ये किरण गोडसे यांनी मांडला व तो पारित करण्यात आला. 

     सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंत मुंडे बाळासाहेब शेंडगे,आनंद राजपूत,अशोक पाटील, भारत कन्हेरे ,नामदेव अनहुले,नारायण करंजकर आदिंनी परिश्रम घेतले.

कुर्डुवाडीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा  Senior Citizens Day celebrated in Kurduwadi
 
Top