निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठीच 'माझी वसुंधरा' हे अभियान

    पंढरपूर,(दिनेश खंडेलवाल) - राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'माझी वसुंधरा' या अभियानासाठी तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी जयंत खंडागळे यांनी दिली.

मानवी स्वभावातील बदलासाठी जनजागृती करण्यासाठी 

    महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने पर्यावरण व वातावरणीय बदल यासाठी 'माझी वसुंधरा' हे अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियान २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधी मध्ये राबविले जात असून निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्वावर पर्यावरण व वातावरणीय बदल कार्य करीत असतात.पृथ्वी तत्वाशी संबंधित वनिकरण,वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन,सांडपाणी व्यवस्थापन,जमिनीची धूप आदी बाबींवर कार्य करणे,वायू प्रदूषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे,जैव विविधता,जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण,नदी संवर्धन,ऊर्जा बचत,अपारंपरिक ऊर्जानिर्मिती साठी नाविन्यपूर्ण उपक्रम,आकाश तत्वास स्थळ व प्रकाश या स्वरूपात निश्चित करून मानवी स्वभावातील बदलासाठी जनजागृती करणे या प्रमुख बाबींचा समावेश माझी वसुंधरा या अभियानात करण्यात आला आहे. लक्ष्मी टाकळी गावातील नागरिकांनी या अभियानासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला पाहीजे. लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी नागरिकांनी या अभियान मोहिमेत सहभाग घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवत पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्वावर पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

'माझी वसुंधरा' अभियानासाठी लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीची निवड
 Selection of Lakshmi Takli Gram Panchayat for 'Majhi Vasundhara' campaign
 
Top