स्त्री आधार केंद्रातर्फे २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर रोजी आँरेज डे निमित्ताने वेगवेगळ्या विषयांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
     पुणे,दि.०१/१२/२०२०(डॉ अंकिता शहा) - स्त्री आधार केंद्रातर्फे दरवर्षी २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर महिला अत्याचाराच्या प्रश्नावर वेगवेगळ्या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन केले जातात. तसेच या वर्षी ही स्त्री आधार केंद्रातर्फे दि.२५ नोव्हेंबर ते दि.१० डिसेंबर रोजी कोरोनाचा धोका असल्यामुळे दुरदृश्य प्रणालीद्वारे महिलांसाठी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन केले आहे. त्यात ३० ऑक्टोंबर २०२० रोजी कौटुंबिक हिंसाचार या विषयावर जेष्ठ विधी तज्ञ व माजी सरकारी वकील अँड. उज्वला पवार यांनी मार्गदर्शन केले.

    यावेळी बोलताना त्या म्हणाल्या,व्हाट्सअप वर आजच्या काळामध्ये सकाळी अनोळखी व्यक्ती बरोबर गुड मॉर्निंग पासून सुरुवात होते,ते दिवसभर आणि एक मेसेज पाठवून संध्याकाळी गुड नाईट पर्यंत मेसेज येतो व त्याचे रूपांतर महिला अत्याचारामध्ये होते.कौटुंबिक हिंसाचार शारीरिक-मानसिक अत्याचार, हुंडा मागणे, सासू-सासर्‍यांनी त्रास देणे , लाँकडाऊनमध्ये असे अनेक प्रकारच्या केसेस वाढल्या आहेत. अत्याचाराची व्याख्या करायची झाली तर शारीरिक व मानसिक बौद्धिक त्रास देऊन कोणतेही इजा करणे व सर्व बंधने आणणे यासाठी अत्याचार म्हणता येते.स्त्री आधार केंद्रातर्फे विधी सहाय्य पीडित स्त्रियांना करत आहे. तसेच इतर संस्थांनीदेखील स्त्री आधार संस्थांसारखे काम करावे, यात आमच्याकडून सहकार्य मिळेल. यासाठी समुपदेशन व सर्वांचा एकमेकांशी संवाद होणे गरजेचे आहे असे देखील ऍड पवार या म्हणाल्या.

      स्त्री आधार केंद्र मानद अध्यक्षा व महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे या बोलताना म्हणाल्या की, कौटुंबिक हिंसाचार लॉकडाउन काळात खूप वाढला आहे. सरकारी वकील अँड. उज्ज्वला पवार यांनी विधी सहाय्य पीडित महिलांना मदत करण्यासाठी सोशल वर्कर नेमले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.हिंसाचाराचे वेगवेगळे प्रकार त्यात शाब्दिक हिंसा, महिलेला क्षणभरही आराम न मिळु देणे,अपशब्द वापरणे , आदळ आपट करणे, व्यसनामुळे होणारी हिंसा, मुल उशिरा होणे म्हणून छळ, नातेवाईकांकडून लग्नात देण्या-घेण्यावरून होणारी हिंसा, नोकरी करणारी महिला असेल तर तिच्या पगारावरून होणारी हिंसा, मानसिक व बौद्धिक हिंसा, सुंदर दिसणाऱ्या महिलेवर होणारी टीका, मुलं काळी असेल तर त्यावरून होणारी हिंसा, एखादी महिला काळी दिसत असेल तर त्याच्यावरून होणारी हिंसा असे हिंसेचे वेगवेगळे प्रकार सांगितले. अशा प्रकारे लाँकडाऊन काळात अनेक प्रकारच्या केसेस स्त्री आधार केंद्राकडे आल्या त्यांचे समुपदेशन केले व अनेक केसेसचे समझोता करण्यात आले असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. 

        या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन अपर्णा पाठक यांनी केले.यावेळी संस्थेच्या विश्वस्त शोभा कोठारी,जेहलम जोशी, मीना इनामदार,रमेश शेलार,अनिता शिंदे,विभावरी कांबळे, संजय शिरसाठ,जयश्री भारती आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        कौटुंबिक हिंसाचार शारीरिक-मानसिक अत्याचार, हुंडा मागणे,सासू-सासर्‍यांनी त्रास देणे, लाँकडाऊनमध्ये असे अनेक प्रकारच्या केसेस वाढल्या आहेत adv Ujjwala pawar 

     लाँकडाऊन काळात अनेक प्रकारच्या हिंसाचाराच्या केसेस स्त्री आधार  केंद्राकडे आल्या,Amdar Nilamtai Gore Shivsena
 
Top