स्वरसम्राट - २०२० या राज्यस्तरीय ऑनलाईन कराओके गीत गायन स्पर्धेत

पंढरपूर,(नागेश आदापूरे),१०/१२/२०२० - येथील कवी व सामाजिक कार्यकर्ते रवि वसंत सोनार यांनी स्वानंदासाठी गीत गायनाचा छंद जोपासत असतानाच महाराष्ट्रातील प्रख्यात महाराष्ट्र संवाद न्यूजच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्वरसम्राट - २०२० या राज्य स्तरीय ऑनलाईन कराओके गीत गायन स्पर्धेत उद्योजक विभागातून सहभाग नोंदवला.

    जाणकार आणि हितचिंतकांच्या लाईक स्वरुपातील मतांच्या सहकार्य तसेच शुभेच्छांमुळे एकूण सर्व सहभागी स्पर्धकांमधून पहिल्या फेरी नंतर त्यांची टॉप ५० सिंगरमध्ये निवड झाली. तर दुसऱ्या फेरीनंतर टॉप ३० सिंगरमध्ये निवड झाली. आणि तिसऱ्या फेरीनंतर टॉप १० सिंगरमध्ये निवड झाली.

    या अटीतटीच्या स्पर्धेत अंतिम फेरीत त्यांनी गायलेल्या सूर तेच छेडीता या मराठी गीताच्या व्हिडिओला रसिक श्रोत्यांनी लाईक तसेच कमेंट करुन चांगला प्रतिसाद दिल्यामुळे उदयोन्मुख कराओके सिंगर रवि वसंत सोनार हे स्वरसम्राट २०२० च्या स्पर्धेत उद्योजक विभागातून प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. 

   त्यांच्या निवडीमुळे सांस्कृतिक, चित्रपट क्षेत्राशी संबंधित तसेच अनेक क्षेत्रात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.

स्वरसम्राट स्पर्धेत रवि सोनार उद्योजक विभागात सर्वप्रथम Ravi sonar First in the Entrepreneur category in the Swarsamrat competition 
 
Top