राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी अज्ञान,अंधश्रद्धा, अस्पृश्यता,अस्वच्छता,अनिष्ठ रूढी परंपरा संपविण्यासाठी जीवनभर कार्य केले


      पंढरपूर,(गणेश ननवरे)- समाजामध्ये अज्ञान , अंधश्रद्धा, अस्पृश्यता, अस्वच्छता ,अनिष्ठ रूढी परंपरा संपविण्यासाठी जीवनभर कार्य केले. जातिभेदाविरुद्ध लढा उभा करून धर्मशाळा, शाळा,नदीवरील घाट बांधण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातले असे संत गाडगेबाबा यांची ६४ वी पुण्यतिथी पंढरपूर येथे संपन्न झाली. गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन वाघमारे महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले.

   यावेळी सोलापूर जिल्हा परीट समाजाचे अध्यक्ष संजय घोडके, जिल्हा सचिव दत्तात्रय क्षिरसागर, तालुकाध्यक्ष गणेश ननवरे,शहराध्यक्ष विजय वरपे, युवक शहराध्यक्ष रामेश्वर साळुंखे,माजी शहराध्यक्ष कैलास नवले,रवी ननवरे,दयानंद पवार,वैभव ननवरे,बाळासाहेब घोडके,पवन घोडके, माऊली गायकवाड, नागेश राऊत, सचिन घोडके, अमित गायकवाड, संग्राम घोडके, दादा घोडके,दादा ननवरे,सुनिल कांरडे, सोमनाथ गायकवाड,योगेश घोडके,रविंद्र शिंदे,उध्दव घोडके, अरूण घोडके, भुषण घोडके,सतिश वरपे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर तालुका व शहर परीट समाज यांनी केले होते.

पंढरपूर येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी Rashtrasant Gadge Maharaj Punyatithi celebration at Pandharpur
 
Top