पंढरपूर,२२/१२/२०२० - सु.रा.परिचारक पतसंस्था, पंढरपूर येथे पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे नूतन विधान परिषद सदस्य आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी पंढरपूर शहर राष्ट्रवादी,काँग्रेस पार्टी, शिवसेना महाविकास आघाडीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


     त्यावेळी पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष सुधीर भोसले,उपाध्यक्ष सचिन कदम, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश बापू पाटील,पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रकाश तात्या पाटील,शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे,पंढरपूर काँग्रेस शहराध्यक्ष ऍड राजेश भादुले,OBC काँग्रेसचे मधुकर फलटणकर ,यूवक कॉंग्रेसचे संदीप शिंदे, सोमनाथ आरे आदीसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


    यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार जयंत आसगावकर म्हणाले,शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण विभागाच्या संबंधित सर्व प्रकारच्या अडचणी सोडवण्यासाठी मी माझ्या पदाचा नक्कीच वापर करेन.

         सत्कार कार्यक्रमानंतर काँग्रेसचे पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रकाश तात्या पाटील यांनी आमदार प्रा.जयंत आसगावकर यांचेसह उपस्थितांचे आभार मानले.

पुणे विभाग शिक्षक मतदार संघ नूतन आ.प्रा. जयंत आसगावकर यांची सदिच्छा भेट pune division teachers constituency new mla prof. jayant asgaonkars goodwill visit 
 
Top