ना.श्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागास योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना

पुणे दि.०३/१२/२०२०- राज्यात मंगल कार्यालये मोठ्या अडचणीत आहेत. याबाबत त्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यातील मंगलकार्यालय संघटनेनी महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली व त्यांच्यासमोर समस्या मांडल्या. यांच्या समस्यांबाबत ना.डॉ. गोऱ्हे यांनी मंत्री ना.एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे पत्र देऊन या विषयाबाबत सूचना केल्या.

त्या पत्रात लक्ष वेधले आहे की राज्यातील मंगल कार्यालया साठी विवाह प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींसाठी २०० ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तथापि काही मंगल कार्यालये ही आकाराने मोठी आहेत. याकरिता साधारणतः चाळीस चौरस फुटासाठी एक व्यक्ती या प्रमाणात मंगल कार्यालयांच्या क्षेत्रफळावर आधारित व्यक्तींना परवानगी दिल्यास सुरक्षित अंतराचे पालनही होईल. तसेच मोठ्या मंगल कार्यालयांना काही प्रमाणात अधिक उत्पन्न मिळू शकेल अशी मागणी  ना.डॉ.गोऱ्हे यांनी केली आहे. 

कोरोनाच्या  कालावधीसाठी तो घरगुती दराने वसूल करण्याच्या सूचना

      तसेच मंगल कार्यालये व लॉन्स यांच्यासाठी प्रोपर्टी टॅक्स वाणिज्य दराने आकारण्यात येतो व तो कमी करून कोरोना च्या  कालावधीसाठी तो घरगुती दराने वसूल करण्याच्या सूचना संबंधित महानगरपालिका व नगरपालिकांना यांना देण्यात यावेत याबाबत ना.डॉ.गोऱ्हे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र पत्राद्वारे सूचना केली आहे. या निवेदनाच्या अनुषंगाने ना.श्री. एकनाथ शिंदे यांनी प्रधान सचिव नगरविकास यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

    याबाबत उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री अजित पवार आणि पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना ना.डॉ.गोऱ्हे यांना देखील माहितीस्तव पत्र देऊन कारवाईसाठी सूचना दिल्या आहेत.

   मंगल कार्यालयासाठी विशेषतः हिरवळींवरील लग्नप्रसंगी उपस्थितीची मर्यादा वाढविण्याबाबत तसेच लॉकडाऊन काळातील मनपाने मंगल कार्यालयांचा कर लॉकडाऊन काळात व्यापारी पद्धतीऐवजी  घरगुती वापराच्या नियमानुसार घेण्याबाबत ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सूचना
 
Top