पंढरपूर - आज दिनांक ०४/१२/२०२० रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा संपन्न झाली . त्यावेळी श्री विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा मंदिर समिती सदस्य ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व श्री रुक्मिणी मातेची पूजा मंंदिर व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते संपन्न झाली.

प्रक्षाळ पूजेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास संपूर्ण मंदिरात फुलांची आरास

     प्रक्षाळ पूजेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास तसेच संपूर्ण मंदिरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. प्रक्षाळ पूजेनिमित्त या दिवसापासून श्रींचे राजोपचार सुरू होतात.


या फुलांची आरास राजूशेठ मोहिते,निवृत्ती मोहिते, अभिजित मोहिते, राहुल ताम्हाणे,राजेंद्र नाईक, अमोल शेरे सर्व राहणार पुणे या भाविकांच्यावतीने करण्यात आली होती. यामध्ये झेंडू आँर्केट गुलाब कारनेशन आष्टर शेवंती एँथेरियम कागडा तुळशी आवळा चाफा कामिनी कन्हेर निशिगंध अशोकाची पाने व फुलांचे तसेच अननस व मोसंबी या फळांपासून साधारणतः दहा ते पंधरा रंगसंगती वापरून आरास करण्यात आली होती. यासाठी साधारण तीन टन फुले वापरण्यात आली होती.

   या फुलांची आरास श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी केली होती. या फुलांच्या आरासीमुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह मंदिरात मनमोहक स्वरूप प्राप्त झाले होते अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.
 
Top