अर्धा ब्रास वाळूसह एकूण किंमत तीन लाख तीन हजाराचा माल जप्त

पंढरपूर, १६/१२/२०२०- पोलीस शिपाई गणेश लक्ष्मण बाबर,पंढरपूर तालुका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भैया उत्तम शिंदे,वय २० वर्ष,राहणार आंबे तालुका पंढरपूर दि १६/१२/ २०२० रोजी सकाळी ०६/३० वाजता आंबे शिवारातील आंबे तारापुर रोडवरील पांडुरंग मनोहर दांडगे यांचे घराजवळ एक पांढऱ्या रंगाचा महिंद्रा बोलेरो कंपनीचा पिकअप वाळूसह तीन लाख तीन हजार रु.चे मिळाला.पांढर्या रंगाचे महिंद्रा बोलेरो कंपनीचे पिकअप नंबर एम एच 13 CU 1378 च्या पाठीमागील भागात ३००० रूपयांच्या सुमारे अर्धा ब्रास वाळूसह एकूण किंमत तीन लाख तीन हजाराचा माल मिळाला तो जप्त करण्यात आला.  

भीमा पात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन

     याची हकीकत अशी आरोपी भैया उत्तम शिंदे, वय २० वर्ष , राहणार आंबे, तालुका पंढरपूर , पिकअपचा मालक यांनी संगनमत करून मौजे आंबे गावच्या हद्दीतील भीमा नदीचे पात्रातून अवैधरित्या विनापरवाना बेकायदेशीरपणे वाळूचे उत्खनन करून वाळू वरील पिकपमध्ये भरून घेऊन जात असताना मिळून आला म्हणून पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं.595 /2020  कलम -भादवि 379 34 सह कायदा कलम 4(1),4 क (1)व 21 प्रमाणे पोलीस शिपाई गणेश लक्ष्मण बाबर,पंढरपूर तालुका यांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास पो.ना.श्रीराम ताटे हे पंढरपूर तालुका पोलिस निरीक्षक किरण अवचर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली करत आहेत. 

  आता अवैधरित्या विनापरवाना बेकायदेशीरपणे वाळूचे उत्खनन करणार्‍यांवर कडक कारवाई करावी लागणार आहे . कारण या अवैध वाळू वाहतुकीमुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे.  

  अवैधरित्या विनापरवाना बेकायदेशीरपणे वाळूचे उत्खनन,पोलिसांनी केली कारवाई Police take action to excavate sand illegally without a license 
 
Top