खंडणी मागून ब्लॅकमेल करत मानसिक त्रास देत होता

पंढरपूर,१८/१२/२०२०- एप्रिल २०१९ पासून तानाजी कांबळे हा फिर्यादी चंद्रकांत शिवाजी आवटे , वय वर्षे ३८, राहणार लक्ष्मी टाकळी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर यास खंडणी मागून ब्लॅकमेल करत होता. कधी जेवण मागून, कधी पैसे मागून त्रास देत होता.त्याने फिर्यादीस तुझ्यावर आता माझ्या बायकोवर बलात्कार केल्याची केस घालतो,माझा मोबाईल जबरदस्तीने चोरी केलेली केस घालतो,मला तात्पुरते दहा हजार रुपये दे तुझी केस वर्षभर चालेल,पुढचं पुढे बघू असे म्हणून मानसिक त्रास देत होता. त्याचे रेकॉर्डिंग करण्याकरता फिर्यादीने लहान मोबाईल खरेदी केला.दि १६/१२/२०२० रोजी फिर्यादी चंद्रकांत शिवाजी आवटे यास तानाजी कांबळे हा धाब्यावर जेवण घाल म्हणून धमकावलेने त्याला रात्रीचे जेवण किंमत रुपये ३३८/- चे दिले.दिनांक १७/१२/२०२० रोजी सायंकाळी सहा वाजता तानाजी कांबळे यांनी फिर्यादी चंद्रकांत शिवाजी आवटेंकडून खंडणी म्हणून तीन हजार रुपये घेतले त्या घटनेवेळचे वाईस रेकॉर्डिंग केलेले आहे .

पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडून चौकशी करता  घेतले ताब्यात 

याबाबत फिर्यादीने १७/१२/२०२० रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,पंढरपूर येथे तक्रार अर्ज दिला होता. त्याची चौकशी चालू असताना दिनांक १८/१२/२०२० रोजी दुपारी २.५५ च्या सुमारास तानाजी कांबळेनी फिर्यादीस धमकी देऊन खंडणीची रक्कम रुपये रू ७०००/- देण्याकरता श्रीराम हॉटेल,पंढरपूर येथे बोलावून घेऊन फिर्यादीकडील दोन हजार रुपये तीन नोटा व ५०० रुपये दराच्या दोन नोटा असे एकूण सात हजार रुपये खंडणीची रक्कम स्वीकारून संगनमताने त्याचे सोबत आलेले त्याचे दोन मित्र पांडुरंग अहिलाजी शेळके,राहणार अंबिकानगर, जुना सोलापूर रोड, पंढरपूर यांच्याकडे देऊन ज्योतीराम भानुदास कांबळे,राहणार भटुंबरे, तालुका पंढरपूर ,जि. सोलापूर व पांडुरंग अहिलाजी शेळके यांना तिथून निघून जाण्यास सांगून तो स्वतः गोल्डन टीमध्ये पळून गेला होता. पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडून चौकशी करता ताब्यात घेतले आहे.

आरोपीतांनी आर्थिक ,मानसिक शारीरिक नुकसान केले असल्यास

       तानाजी गोविंद कांबळे,तंटामुक्ती अध्यक्ष,लक्ष्मी टाकळी पंढरपूर हा लक्ष्मी टाकळी परिसरातील लोकांना वेग वेगळ्या कारणाने धमकावून पैसे उकळत असल्याची माहिती मिळाली आहे.पांडुरंग अहिलाजी शेळके पेंटर ,ज्योतीराम भानुदास कांबळे -साप्ताहिक पोलिस ऑफिसर -प्रतिनिधी/ पत्रकार यांनी फिर्यादीस संगनमताने ब्लॅकमेल करून माझ्यावर खोट्या केसचा आळ घेऊन तसेच बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवीन, जबरदस्ती चोरी केल्याच्या गुन्ह्यात अडकविन असे म्हणून दहा हजार रुपये खंडणी मागून दोन दिवसात ती रक्कम फिर्यादीकडून घेतली आहे.पंढरपुरात अशा प्रकारे कोणास खंडणी मागून वरील आरोपीतांनी आर्थिक ,मानसिक शारीरिक नुकसान केले असल्यास त्याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय पंढरपूर येथे येऊन माहिती देण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर विभाग विक्रम कदम यांनी केले आहे.

       सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे, वाचक पोलीस सब इन्स्पेक्टर हमीद शेख,पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश माळी , पोलीस कॉन्स्टेबल राहुल लोंढे, पोलीस नाईक निलेश रोंगे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद शिंदे, पंढरपूर शहर डीबी पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ, पोलिस नाईक सुनिल बनसोडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश रोडगे यांनी छापा कारवाई केली असून, गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मकदूम पंढरपूर शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

पोलिसांनी ब्लँकमेलिंग करणार्‍या त्या तिघांना रंगेहात पकडून चौकशी करता ताब्यात घेतले police arrested three culprits and interrogated them
 
Top