पंतप्रधान- मी देखील श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या दयाळूपणाने प्रेरित झालो

      नवी दिल्ली,PIB Mumbai,२० डिसेंबर २०२०-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील गुरुद्वारा रकिबगंज साहिब येथे भेट दिली आणि गुरू तेग बहादूर यांना त्यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली.

आज सकाळी,मी ऐतिहासिक गुरुद्वारा रकिबगंज साहिब येथे भेट दिली, जिथे श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या पवित्र पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.मी अत्यंत धन्य झालो. जगभरातील कोट्यवधी लोकांप्रमाणेच, मी देखील श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या दयाळूपणाने प्रेरित झालो आहे.गुरू साहेबांची खास कृपा आहे की,आमच्या सरकारच्या कार्यकाळात आम्ही श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या ४०० व्या प्रकाश पर्वाचा विशेष उत्सव साजरा करणार आहोत.चला,हा पवित्र कार्यक्रम ऐतिहासिक पद्धतीने आणि श्री गुरू तेग बहादूरजी यांचा आदर्श कायम राहील असा साजरा,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रकिबगंज गुरुद्वारास दिली भेट,गुरू तेग बहाद्दूर यांना वाहिली श्रद्धांजली 
PM visits rakibganj gurdwara, pays homage to guru tegh bahadur
 
Top